प.पू. रामानंद महाराज यांचा देहत्याग

सनातनचे श्रद्धास्थान असणारे इंदूर येथील
प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांचा देहत्याग

प.पू. रामानंद महाराज H.H. Ramanand Maharaj

प.पू. रामानंद महाराज

 

मुंबई – इंदूर येथील प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी आणि सनातनचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांनी ११ मार्च २०१४ या दिवशी पहाटे ३.३० वाजता इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमात देहत्याग केला. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना फुप्फुसाचा आजार होता. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांचे ते गुरुबंधू होते. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गोवा, विशाखापट्टणम् इत्यादी ठिकाणी त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे. भक्तांना अंतिम दर्शन व्हावे, यासाठी प.पू. रामानंद महाराजांचे पार्थिव ११ मार्चला दिवसभर भक्तवात्सल्याश्रमात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर १२ मार्च या दिवशी इंदूर येथील रामबागमधील मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता आश्रमातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे, असे भक्तवात्सल्याश्रमाचे श्री. अनिल जोग यांनी कळवले आहे.

 

प.पू. रामानंद महाराज यांचा परिचय

प.पू. रामानंद महाराज यांचे मूळ नाव श्री. रामचंद्र लक्ष्मण निरगुडकर. ते प्रखर राष्ट्रप्रेमी होते. त्यामुळे १९४८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. १९४८ ते १९६४ त्यांनी संघाचे खूप काम केले. प.पू. रामानंद महाराजांनी चाळीस वर्षे प.पू. भक्तराज महाराजांची सेवा जीवाभावाने केली. प.पू. रामानंदांची सेवा, त्याग, भक्ती, निष्ठा यांनी प.पू. भक्तराज प्रसन्न झाले आणि म्हणूनच म्हणाले, शंभर भक्तराज होतील; पण रामजीसारखा एक शिष्य होणे कठीण.

 

आपला नम्र,
श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त,
सनातन संस्था

Leave a Comment