प.पू. डॉक्टरांनी आजारपणात वापरलेल्या आणि सुगंध येणार्‍या थुंकीच्या आणि उलटीच्या भांड्यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास

अध्यात्माचा विज्ञानाद्वारे कस न लावताच अध्यात्माला खोटे ठरवणारे असतात
तथाकथित पुरोगामी, तर अध्यात्म विज्ञानाच्या पद्धतीने मांडणारी सनातन संस्था आहे खरी पुरोगामी !

प.पू. डॉक्टरांनी आजारपणात वापरलेल्या आणि
सुगंध येणार्‍या थुंकीच्या आणि उलटीच्या भांड्यांतून
प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला
अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन !

 

थुंकी थुंकण्यासाठी प्लास्टिकचे भांडे
थुंकी थुंकण्यासाठी प्लास्टिकचे भांडे

१. प.पू. डॉक्टरांनी आजारपणात वापरलेल्या थुंकीच्या आणि उलटीच्या भांड्यांना सुगंध येऊ लागणे

एप्रिल २००९ मध्ये प.पू. डॉक्टरांची प्राणशक्ती केवळ ३० टक्के झाल्याने ते अंथरुणाला खिळून होते. सुदृढ व्यक्तीची प्राणशक्ती १०० टक्के असते आणि प्राणशक्ती ३० टक्क्यांहून न्यून झाल्यास व्यक्ती मृत होते. अंथरुणाला खिळून असतांना खोकला झाल्याने प.पू. डॉक्टरांनी थुंकी थुंकण्यासाठी प्लास्टिकचे भांडे काही दिवस वापरले. एक दिवस त्या भांड्याचा सहज वास घेतल्यावर त्याला सुगंध येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते वैशिष्ट्यपूर्ण भांडे जतन करण्यात आले. आता जानेवारी २०१४ मध्ये त्या घटनेला साडेचार वर्षे होऊनसुद्धा त्या थुंकीच्या भांड्याला अजूनही सुगंध येत आहे. प.पू. डॉक्टर आजारी असतांनाच्याच कालावधीत त्यांनी उलटीसाठीही प्लास्टिकचे भांडेही (डबा) वापरले. त्यालाही सुगंध येऊ लागला आणि तो अजूनही येत आहे.

 

उलटीसाठी प्लास्टिकचे भांडे
उलटीसाठी प्लास्टिकचे भांडे

२. संतांच्या उपयोगातील वस्तूंमध्ये सत्त्वगुण वाढल्याने त्या वस्तूंमध्ये चांगले पालट होत असणे

सामान्य व्यक्तीमध्ये सत्त्व : रज : तम यांचे प्रमाण २० : ३० : ५० असे असते, तर संतांमध्ये हेच प्रमाण ७५ : २० : ५ असे असते. याचा अर्थ सामान्य व्यक्तीच्या तुलनेत संतांमधील तमोगुणाचे प्रमाण पुष्कळ अल्प होऊन सत्त्वगुणाचे प्रमाण पुष्कळ वाढलेले असते. साधना करणे म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे. ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न, म्हणजेच ईश्‍वराचे गुण आत्मसात करून त्याच्याशी एकरूप होण्यासाठीचे प्रयत्न. संतपद येणे म्हणजे साधनेच्या प्रवासात ईश्‍वराशी एकरूप होण्याच्या टप्प्याच्या निकट पोहोचणे. त्यामुळे तेव्हा अंगी काही अंशी देवपण आलेले असते; म्हणूनच संतांच्या स्पर्शाने त्यांच्या उपयोगातील वस्तू सत्त्वगुणी बनून त्यांच्यात चांगले पालट होतात आणि त्यामुळेच अनमोल साठा म्हणून त्या जतन करून ठेवण्याची प्रथा आहे.

 

३. प.पू. डॉक्टरांनी आजारपणात वापरलेल्या थुंकीच्या
आणि उलटीच्या भांड्यांची वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही किंवा ती वस्तू आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक वस्तूतील स्पंदनांचे निदान अचूक लावू शकतात. भक्त, साधक संतांनी सांगितलेले शब्दप्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध केली असेल, तरच ती खरी वाटते. येथे प.पू. डॉक्टरांनी वापरलेल्या आणि सुगंध येणार्‍या थुंकीच्या आणि उलटीच्या भांड्यांमधून कशी स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, हे वैज्ञानिकदृष्ट्या पडताळण्याच्या उद्देशाने आर्.एफ्.आय. रीडिंग उपकरण आणि पिप तंत्रज्ञान यांचा उपयोग करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

४. आर्.एफ्.आय. रीडिंग उपकरण आणि पिप तंत्रज्ञान यांची ओळख

आर्.एफ्.आय. (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) रीडींग उपकरणाच्या साहाय्याने आपण वातावरणातील वैश्‍विक ऊर्जा मोजू शकतो, तर पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूभोवती असणार्‍या स्पंदनांची गती, तसेच त्या वस्तूची रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय उपकरणाला व्हिडीओ कॅमेर्‍याशी जोडून त्यात असलेल्या वेगवेगळ्या फिल्टरद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जावलये पहाता येतात. हे उपकरण रंगांचे विभाजन करते. यात सकारात्मक आणि नकारात्मक रंग त्यांच्या क्षमतेनुसार दिसण्याची सोय आहे. पिप प्रणालीनुसार नारिंगी आणि जांभळा रंग तणावाची किंवा त्रासदायक स्पंदने यांचे प्रतीक आहे. गुलाबी रंग राजसिकतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग आध्यात्मिक उपायांशी संबंधित सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. निळा (आकाशी) रंग सात्त्विकता किंवा शांती यांचे प्रतीक आहे, तर सोनेरी छटा असलेला पिवळा रंग उच्चस्तरीय वैश्‍विक स्पंदने दर्शवतो.

 

५. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण

 

आर्.एफ्.आय. नोंद आणि तिचे विवरण

पिपद्वारे प्रभावळीचे केलेले
वर्णन आणि त्याचे विविरण

आर्.एफ्.आय.

नोंद (मेगाहटर्स)

विवरण

१. प.पू. डॉक्टरांनी
वापरलेले आणि
गंध येणारे थुंकीचे
भांडे

१२५

या कंपनसंख्येचा रंग सोनेरी आहे. हा रंग अध्यात्मातील उच्च स्तर दर्शवतो.

थुंकीच्या भांड्याच्या सभोवती शातं अशी पिवळ्या रंगाची वलये दिसनू येतात. भांड्याभोवतीची प्रभावळ स्थिर आणि चांगली आहे.

२. प.पू. डॉक्टरांनी
वापरलेले आणि सुगंध
येणारे उलटीचे भांडे

१२३

या कंपनसंख्येचा रंग तांबडा आहे. ही कंपने भावनिक आणि बौद्धिक विचारांची गतिमानता दर्शवतात.

उलटीच्या भांड्यातून वरील बाजूस प्रक्षेपित होणारी आकाशी रंगाची स्पंदने सकारात्मकता आणि निर्गुण तत्त्व दर्शवतात. ही स्पंदने वाढत जात आहेत. प्रभावळीमध्ये ज्ञानाची पिवळ्या रंगाची वलयेही मोठ्या प्रमाणात आहेत. या स्पंदनांच्या बाजूला मात्र नकारात्मक अशी जांभळ्या रंगाची स्पंदने काही प्रमाणात दिसून येतात. भांड्यातून निघणारी सकारात्मक वलये वातावरणातील नकारात्मक शक्तीला दूर करत आहेत.

 

वरील निरीक्षणांतून असे दिसून येते की, प.पू. डॉक्टरांनी या भांड्यांचा वापर केल्यामुळे ती भांडी निर्जीव असूनसुद्धा त्यांचे स्वतःचे गुणधर्म पालटले गेले. प.पू. डॉक्टरांच्या स्पर्शामुळे हे पालट झाले. – श्री. संतोष शामराव जोशी

 

वैज्ञानिकांना आवाहन

या प्रयोगांच्या निष्कर्षांच्या संदर्भात सनातन संस्था अधिक संशोधन करत आहे. या संशोधनातील निरीक्षणांमागची आध्यात्मिक कारणमीमांसा संत सांगू शकतात; पण सामान्यजनांना प्रयोगांचे निष्कर्ष वैज्ञानिक भाषेत कळावेत, यासाठी वैज्ञानिकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या विषयांवर शास्त्रीय संशोधन करणार्‍यांकडून साहाय्य मिळाल्यास आम्ही आभारी होऊ.

 

(संपर्क : पू. डॉ. मुकुल गाडगीळ, इ-मेल : [email protected])

Leave a Comment