काशी सुमेरु पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती
यांचे हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यास आशीर्वाद

स्वामी नरेंद्रानंद सरस्वती समितीच्या कार्यकर्त्यांना विविध नियतकालिकांमधील
त्यांच्या झारखंड भेटीच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवतांना
जमदेशदपूर (झारखंड) – सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांचे समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे. समितीचे कार्यकर्ते वेळोवेळी संपर्कात असतात, असे सांगत काशी सुमेरु पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी समिती आणि सनातन यांच्या कार्याला आशीर्वाद दिले.
स्वामीजी त्यांच्या पुरुलीया (बंगाल) येथील प्रवासादरम्यान काही वेळ जमशेदपूर येथे थांबले असतांना सनातनचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते श्री. आनंद महाराणा, श्री. आलोक पांडे, श्री. बी.व्ही.आर्. कृष्णा आणि श्री. वैभव आफळे यांनी स्वामीजींचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले.
सनातननिर्मित धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ स्वामीजींना दाखवताच त्यातील धर्मशिक्षणाच्या संदर्भातील मजकूर वाचून आजच्या पिढीला याचीच आवश्यकता आहे आणि तुम्ही ते करत आहात हे कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
काशी सुमेरु पीठाधीश्वर स्वामी नरेंद्रानंद सरस्वती वर्ष २०१३ मधील कुंभमेळ्याच्या कालावधीत मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेतील आंदोलनात सहभागी झाले होते. धार आंदोलनावेळचे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग समितीच्या कार्यकर्त्यांना याप्रसंगी सांगितले.