केरळ येथील सनातनच्या साधकांनायोगऋषी रामदेवबाबा यांचा आशीर्वाद !

योगऋषी रामदेवबाबा

योगऋषी रामदेवबाबा

पालक्कड (केरळ) – येथे आयोजित धर्मसूय महायागामध्ये सहभागी झालेले योगऋषी रामदेवबाबा यांची सनातनच्या साधकांनी भेट घेतली असता त्यांनी साधकांना आशीर्वाद दिला.

१. सनातनच्या साधकांना भेटल्यावर त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, तुम्ही निःस्वार्थपणे खूप चांगले प्रयत्न करत आहात.

२. त्यांनी पुढे सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी सांगितले, प.पू. डॉक्टर खूप महान कार्य करत आहेत.

३. जानेवारी महिन्यात योगऋषी रामदेवबाबा यांनी रामनाथी, गोवा येथे असलेल्या सनातनच्या आश्रमाला भेट दिली होती. त्याबद्दल ते म्हणाले, मला त्या वेळी प.पू. आठवलेजींना भेटण्याची संधी मिळाली.

४. त्यांनी सनातनच्या साधकांना पतंजलीच्या साधकांबरोबर एकत्र येऊन पुढे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास सांगितले आणि साधकांना आशीर्वाद दिला.

५. पुढे योगाचा विस्तार होणार आणि यातून ईश्‍वरी चैतन्य मिळून धर्म अन् संस्कृती टिकून रहाणार आणि त्याचे रक्षणही होणार, असेही ते म्हणाले.

क्षणचित्रे

१. सनातनच्या साधकांनी योगऋषी रामदेवबाबा २०१४ चे सनातन पंचांग भेट म्हणून दिले.

२. योगऋषी रामदेवबाबा खूप व्यस्त होते आणि अन्य कार्यक्रमाला त्यांना जायचे असूनही त्यांनी सनातनच्या साधकांना थोडा वेळ मार्गदर्शन केले अन् छायाचित्रकारांना त्यांचे सनातनच्या साधकांसमवेत छायाचित्र काढायला सांगितले.

३. योगऋषी रामदेवबाबा यांनी पुढे नियोजित असलेल्या पतंजलीच्या बैठकीत सनातनच्या साधकांनाही उपस्थित रहाण्यास सांगितले.

Leave a Comment