महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे रत्नागिरी
जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भगवान विठ्ठल कोकरे महाराज
यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
डावीकडून ह.भ.प.कोकरे महाराज यांना सनातन प्रभात
नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना श्री.रूपेश रेडकर
रामनाथी (गोवा), ६ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भगवान विठ्ठल कोकरे महाराज यांनी ५ फेब्रुवारीला येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी साधक श्री. रूपेश रेडकर यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी, तसेच सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती दिली. सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी ह.भ.प. भगवान विठ्ठल कोकरे महाराज यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.
ह.भ.प. कोकरे महाराज हे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान, पिंपळी, चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष, तसेच महाराष्ट्र राज्य गोसेवा संघाचे गोरक्षक आहेत.
सनातनचा आश्रम म्हणजे भगवंताने धर्मराज्यासाठी
उघडलेला धर्मदरबार ! – ह.भ.प. भगवान विठ्ठल कोकरे महाराज
आश्रमभेटीनंतर ह.भ.प. कोकरे महाराज यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, सनातनचे कार्य संपूर्ण जगातील हिंदूंना प्रेरणादायी आहे. हा आश्रम नसून पृथ्वीवर भगवंताने धर्मराज्यासाठी उघडलेला धर्मदरबार आहे. आश्रमात आढळणारे दैवीकण म्हणजे भगवंताच्या अंगावरील घामाचे थेंब आणि ठिकठिकाणी उमटणारे ॐ म्हणजे भगवंत प्रत्यक्षात येथे येऊन गेल्याच्या पाऊलखुणा आहेत. ईश्वराने हिंदु राष्ट्रासाठी पाठवलेले, तसेच शास्त्र शिकवून धर्माची मशाल पेटवणारे एक युगप्रवर्तक संत म्हणजे प.पू. डॉ. आठवले होय. सनातनच्या कार्याचे वर्णन करतांना शब्दही अल्प ठरतील. आपणास साष्टांग दंडवत !