
पुणे, ३ मार्च (वार्ता.) – पूर्वजांच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी दत्तगुरूंची आराधना केली पाहिजे, तसेच व्यावहारिक अडचणी दूर होण्यासाठी कुलदेवीची उपासना केली पाहिजे, असे मार्गदर्शन पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी केले. ‘जीवनात चिरंतन आनंद अनुभवण्यासाठी काय केले पाहिजे ?’ यासाठी वाणेवाडी येथे जाहीर साधना प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक आणि भूलतज्ञ आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रवचनाला १७५ हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.

या वेळी आधुनिक वैद्या ज्योती काळे म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्ती आनंद मिळवण्यासाठी धडपड करत असते. हा आनंद मिळवण्यासाठी कलियुगात नामसाधना हा सोपा मार्ग आहे. नामामुळे प्रारब्ध नष्ट होते. त्यामुळे नाम घेत केलेल्या कृतीचे पुण्य अथवा पाप लागत नाही. त्यामुळे ते कर्म अकर्म कर्म ठरते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. प्रवचनाच्या ठिकाणी रात्रीची वेळ असूनही चिमण्या आल्या होत्या.
२. प्रवचनाचे आयोजन आणि प्रसारामध्ये स्थानिक धर्मप्रेमी जिज्ञासूंचा सक्रीय सहभाग होता.
३. प्रवचन संपल्यावर सर्व जिज्ञासू स्तब्ध होऊन जागेवरच बसले होते. नंतर अनेक महिलांनी वक्त्यांशी चर्चा केली.
४. अनेक जिज्ञासूंनी असे प्रवचन नेहमी घेण्याची मागणी केली.