Home > कार्य > अध्यात्मप्रसार > रायगड जिल्ह्यांतील सहस्रो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना भेट !
रायगड जिल्ह्यांतील सहस्रो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना भेट !
Share this on :
आंबेपूर, रामनाथ येथे प.पू. प्रमोद केणे काका यांनी ‘सनातन प्रभात’चा महाशिवरात्री विशेषांक भेट देतांना साधक
रायगड – प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. रायगड जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने ४३ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. तेथे सहस्रो जिज्ञासूंनी भेट दिली.
शिवसेना कामोठे शहर प्रमुख श्री. सुनील गोवारी यांनी कामोठे येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.
नवीन पनवेल येथील कृष्ण मंदिरातील ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिल्यावर पनवेल विधासभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांना दैनिक सनातन प्रभात देतांना साधिकाश्री विश्वेश्वर भगवान मंदिर, पेण येथील ग्रंथ प्रदर्शनाला माजी नगराध्यक्ष श्री. संतोष शृंगारपुरे (पेण) यांनी भेट दिल्यावर त्यांना दैनिक सनातन प्रभात देतांना साधकश्री बालाजी मंदिर तपोवन पनवेल येथील ग्रंथ प्रदर्शनाला भेट देतांना विकासक श्री. बन्सल