बांदिवडे, फोंडा येथील सौ. ज्योती ढवळीकर (वय ६३ वर्षे) सनातनच्या १३२ व्या (समष्टी) संतपदी विराजमान

पू. (सौ.) ज्योती ढवळीकर
पू. (सौ.) ज्योती ढवळीकर

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (वार्ता.) – बांदिवडे, फोंडा (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ६३ वर्षे) या १३२ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता २४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिली.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका अनौपचारिक सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. या वेळी  पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि साधक उपस्थित होते. या वेळी सर्वांची भावजागृती झाली.

Leave a Comment