हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

प्रवचनासाठी ४५० हून अधिक जणांची उपस्थिती !

सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान करतांना पुणदी गावच्या सरपंच सौ. पूनम दीपक पाटील (उजवीकडे)

पुणदी (जिल्हा सांगली) – धर्मशिक्षणाअभावी हिंदू पाश्चिमात्य विकृतीच्या आहारी जात आहेत. महिला धर्मपालन करत नसल्याने त्यांना अत्याचारांना सामोरे जावे लागते. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये
प्रवचनानंतर मारुति मंदिरात आरती करतांना श्री. भीमराव खोत, सद्गुरु स्वाती खाडये, तसेच अन्य

त्या येथील प्रवचनात बोलत होत्या. याचा लाभ ४५० जिज्ञासूंनी घेतला. श्री मारुति मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली. प्रवचनाच्या प्रसारासह अन्य व्यवस्था ग्रामपंचायतीने केली. सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान सरपंच सौ. पूनम पाटील आणि मारुति मंदिराचे पुजारी श्री. नागेश गुरव यांनी केला.

Leave a Comment