हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

प्रवचनासाठी ४०० हून अधिक जणांची उपस्थिती !

उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये आणि डॉ.(श्रीमती) शिल्पा कोठावळे (उजवीकडे)

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – कलियुगात प्रत्येक जण आनंद मिळवण्यासाठी धडपडतो; मात्र आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विविध त्रासांना सामोरे जावे लागते. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे आणि आपल्या कुलदेवीचा नामजप केल्यास प्रारब्ध सुसह्य होण्यास साहाय्य होते. नामस्मरण हे आपण कधीही-कुठेही करू शकतो. कुलदेवतेच्या नामजपासमवेत पूर्वजांचा त्रास, तसेच अन्य त्रास होऊ नयेत; म्हणून प्रत्येकाने ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक कृती धर्माचे पालन करून केली, तर त्याचा लाभ होईल. त्यामुळे नामजप आणि धर्मपालन या कृती हिंदूंनी केल्या, तर त्याचा लाभ होतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. येथे ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. या प्रसंगी डॉ.(श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. या वेळी ४०० जिज्ञासू उपस्थित होते.

प्रवचनासाठी उपस्थित जिज्ञासू

विशेष 
१. लहान मुलांनी शेवटपर्यंत शांतपणे प्रवचन ऐकले. कक्षावर सनातन वही खरेदी करण्यासाठी लहान मुलांनी आई-वडिलांकडून पैसे मागून घेतले. एका धर्मप्रेमीने १० डझन सनातन वह्यांची मागणी केली.

२. एका आयोजकांनी प्रवचन ऐकायला मिळावे, यासाठी प्रयागराज येथे जाण्याचे नियोजन पुढे ढकलले.

३. युवक,हिंदुत्वनिष्ठ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

४. प्रवचनाचा प्रसार, व्यासपीठ उभारणी, तसेच सिद्धता धर्मप्रेमींनी केली. प्रवचनाच्या प्रसारासाठी १० बाय १२ चा एक विशेष ‘फ्लेक्स’ सिद्ध करण्यात आला होता.

Leave a Comment