शास्त्र समजून गंगास्नान करणे आवश्यक ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. चेतन राजहंस

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता) – ‘शास्त्र धर्मप्रचार सभा’ या संघटनेने आयोजित केलेल्या माघ-मेळा वार्षिक अधिवेशनात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘गंगानदीचे माहात्म्य आणि गंगा नदीत स्नान कसे करावे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. अलोपी बाग मार्ग, सेक्टर ६ येथे आयोजित या अधिवेशनात १०० हून अधिक भाविकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

मार्गदर्शन ऐकतांना भाविक

या वेळी श्री. राजहंस म्हणाले की, कुठलीही धार्मिक कृती करतांना त्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घेतले, तर ती कृती करतांना भाविकाचा भाव वृद्धींगत होतो आणि त्याचा त्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. त्याचप्रमाणे गंगास्नानाचेही शास्त्र समजून गंगास्नान केले, तर त्याचा भाविकांना निश्‍चितपणे लाभ होईल.

Leave a Comment