बालक-पालक शिबिर

कळंबोली (जिल्हा रायगड) – लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार करणे अत्यंत आवश्यक असून या संस्कारांमुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर पुढे त्यांच्या कुटुंबियांनाही चिरंतन आनंद मिळेल. शाळेतील शिक्षणामुळे एकवेळ पैसा कमवण्याचा मार्ग मिळेल; पण धर्माचरण आणि योग्य संस्कार यांमुळे त्यांच्या भावी आयुष्याचा पाया पक्का होईल. यामुळे पालकांनी धर्माचरण केले, तर बालकेसुद्धा याचे अनुकरण करतील. यातूनच आदर्श पिढी घडेल, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल आणि द.ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालया’त आयोजित बालक-पालक शिबिरात केले.

साधना केल्याने बालकांवर सुयोग्य संस्कार होतील ! – पू. (सौ.) संगीता जाधव, सनातन संस्था

हिंदु धर्मात मोक्षप्राप्तीसाठी अनेक साधना आणि तपस्या आहेत; मात्र आपण वेळेअभावी हे अभ्यासत नाही. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म जयंत बाळाजी आठवले यांनी शेकडो ग्रंथांचा अभ्यास करून अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीत साधना कशी करावी ?, हे सांगितले आहे. या मार्गाचे जरी आपण अनुकरण केले, तरी आपल्याला जीवनात आनंद अनुभवता येईल.
या वेळी सौ. अमृता जुनघरे यांनी या शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सौ. पल्लवी म्हात्रे यांनी सहभागी बालक आणि पालक यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती किचंबरे यांनी केले.
बालसंस्कार वर्गात आल्याने झालेले पालट याविषयी पालकांचे अनुभव !
१. माझ्या मुलाला रात्री वाईट स्वप्न पडायची; पण बालसंस्कार वर्गात नियमित जायला लागल्यावर आता तशी वाईट स्वप्ने पडत नाहीत. – संगीता राठोड
२. मी आणि माझे पती आम्हाला आस्थापनांच्या वेळांमुले घरी यायला विलंब होतो, तेव्हा माझा मुलगा संध्याकाळी प्रतिदिन न चुकता दिवा लावतो. सध्या तो जेवतांना स्वतःचे पेला, वाटी, ताट स्वतः घेऊन बसतो. – उज्ज्वला जाधव