श्रीराम कथावाचक पू. समाधान शर्मा महाराज यांची सनातन संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट !

डावीकडून श्री. माधवराव गाडगीळ, पू. समाधान शर्मा महाराज (मध्यभागी) यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ भेट देतांना श्री. द्वारकाधीश मुंदडा, श्री. प्रकाश पोरे (उजवीकडे)

मिरज, २६ जानेवारी (वार्ता.) – केज, बीड येथील प्रसिद्ध श्रीराम कथावाचक पू. समाधान शर्मा महाराज आळतेकर हॉल येथे आले असता यांची सनातनच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी त्यांना ‘सनातन पंचांग २०२५’, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ भेट देण्यात आले. या प्रसंगी ‘आळतेकर हॉल’चे श्री. अविनाश आळतेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, सनातन संस्थेचे श्री. प्रकाश पोरे आणि श्री. द्वारकाधीश मुंदडा अन् श्री. मनोहरजी सारडा उपस्थित होते. पू. समाधान शर्मा महाराज यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक करून समाजाला या कार्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सांगलीत पू. समाधान शर्मा महाराज यांच्या सुरेल वाणीत १८ जानेवारीपासून कल्पद्रुम मैदान, नेमीनाथनगर, विश्रामबाग येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा २६ जानेवारीअखेर आयोजन करण्यात आले होते. ही कथा आयोजित करण्यात श्री. मनोहरजी सारडा, तसेच त्यांचे सहकारी यांचा पुढाकार होता.

डावीकडून श्री. माधवराव गाडगीळ, पू. समाधान शर्मा महाराज (मध्यभागी) यांना पंचांग भेट देतांना श्री. द्वारकाधीश मुंदडा, श्री. प्रकाश पोरे (उजवीकडे) आणि श्री. अविनाश आळतेकर

Leave a Comment