प्रयागराज, २४ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्यात हिंदु धर्माचा प्रसार करत असलेले सनातन संस्चेथे ‘मोबाईल स्टॉल’ म्हणजेच सनातनचे ‘फिरते ग्रंथ आणि उत्पादन वितरण कक्ष’ हे हिंदु धर्माच्या प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. महाकुंभमेळ्यात अशा प्रकारच्या ७ ‘मोबाईल स्टॉल्स’द्वारे प्रचार करण्यात येत आहे. या सर्व कक्षांवर नियमित सहस्रावधी जिज्ञासू आणि भाविक भेट देत आहेत. नियमित सलग ११ घंटे हिंदु धर्माचा प्रसार करणारे ‘मोबाईल स्टॉल’ अत्यंत प्रभावी ठरत आहेत.
महाकुंभमेळ्यामध्ये काली मार्ग, त्रिवेणी मार्ग, मोरी-शंकराचार्य मार्ग चौक, ओल्ड जी टी मार्ग, नागवासुकी मार्ग आणि बजरंगदास मार्गावरील २, अशा प्रकार ७ ठिकाणी मोबाईल स्टॉल उभारण्यात आले आहेत. या प्रत्येक कक्षावर नियमित ५०० हून अधिक जिज्ञासू भेटी देत आहेत.
असे आहे ‘मोबाईल स्टॉल’चे स्वरूप !
१ मोठे पटल, ३-४ खुर्च्या, असे या फिरत्या कक्षांचे स्वरूप आहे. ‘मोबाईट स्टॉल्स’वर सनातनचे साधना, राष्ट्र-धर्म विषयक, आयुर्वेद, हिंदु संस्कृतीनुसार आचरण, धार्मिक कृत्ये, हिंदु धर्मातील व्रत वैकल्ये, बालसंस्कार, स्वभाषा अभिमान आदी हिंदी, इंग्रजी, कन्नड, मराठी आदी १३ भाषांतील विविध विषयांचे ३६६ ग्रंथ या कक्षांवर उपलब्ध आहेत. यांसह कुंकू, अत्तर, उटणे, उदबत्ती, अष्टगंध, वाती, कापूर, साबण आदी शुद्ध स्वदेशी सात्त्विक उत्पादनेही या कक्षांवर आहेत. एक पटल, आसंदी, मेगा फोन केवळ एवढ्या साहित्याच्या आधारे करण्यात आलेल्या या ‘मोबाईल स्टॉल्स’ना भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. सकाळी ९.३० ते रात्री ८.३० अशा प्रकारे सलग ११ घंटे नियमितपणे मोबाईल स्टॉल्सद्वारे धर्म, अधात्म, राष्ट्र, संस्कृती यांचा प्रभावी प्रचार चालू आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने सनातनच्या काही ‘मोबाईल स्टॉल’ला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी अनेक जिज्ञासू स्वत: ग्रंथ खरेदी करून पुन्हा त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना ‘मोबाईल स्टॉल’वर घेऊन येत आहेत. ‘मेगा फोनद्वारे आम्ही जिज्ञासूंना कक्षावर येण्याचे आवाहन करतो. अनेक जिज्ञासूंनी ग्रंथ खरेदी केल्यावर ते रहात असलेल्या राज्यामध्ये स्थानिक स्तरावर ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने उपलब्ध व्हावीत, यासाठी स्वत:चा पत्ता देतात. अनेक जिज्ञासू ‘मोबाईल स्टॉल’वर येऊन सनातनच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त करतात’, असे ‘स्टॉल्स’वर सेवा करणार्या साधकांनी सांगितले.