श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन

अयोध्येतील ‘श्रीरामलला’ची मूर्ती

फरिदाबाद (हरियाणा) – अयोध्येत श्री रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने हरियाणातील फरिदाबाद आणि धारुहेरा (रेवाडी) येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांना प्रभु श्रीरामाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर श्रीराम आणि हनुमान यांची महाआरती, श्रीरामरक्षास्तोत्र अन् हनुमान चालीसा यांचे पठण, तसेच श्रीरामाचा सामूहिक जप करण्यात आला. सनातन संस्थेच्या सरोज गुप्ता आणि सौ. स्वाती सातपुते यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला. फरिदाबाद येथील कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. दिनेश बंसल उपस्थित होते. या वेळी श्री. बंसल यांनी ‘श्रीरामापेक्षा त्याचे नाव श्रेष्ठ असून ते वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पातळीवर कसे कार्य करते’, याची माहिती सांगितली.

क्षणचित्रे –

१. बालसंस्कारवर्गातील मुलांनी उत्स्फूर्तपणे प्रभु श्रीराम आणि सीता-राम लिहून रांगोळी काढली. यासह प्रभु श्रीरामाच्या पूजेच्या सिद्धतेत बालसाधकांनीही सहभाग घेतला.

२. ‘वेस्टॅक सोसायटी’ मंदिराच्या प्रमुख सौ. सरला यादव यांनी उपिस्थतांसाठी अल्पोपहार, चहा आणि प्रसाद यांची व्यवस्था केली.

Leave a Comment