श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांची भेट !

सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची महाकुंभ तीर्थयात्रा !

महंत रवींद्र पुरीजी यांचा शाल, ग्रंथ व पुष्पहार देऊन सत्कार करताना सनातन संस्थेचे संत पू. प्रदीप खेमका

प्रयागराज (उत्तरप्रदेश), २२ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांची २२ जानेवारीला भेट घेतली. श्रीमहंत रवींद्र पुरीजी हे निरंजनी आखाड्याचेही अध्यक्ष आहेत. या वेळी सनातन संस्थेचे संत पू. प्रदीप खेमका यांनी श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांचा शाल, ग्रंथ, पुष्पहार आणि भेटवस्तू अर्पण करून सन्मान केला, तर श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा प्रसादस्वरूप वस्त्र देऊन आणि श्री दत्तात्रेयाच्या मूर्तीचे छायाचित्र भेट देऊन सन्मान केला, तसेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांना सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सवाचे स्मृतीचिन्ह भेट दिले. श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा प्रसादस्वरूप वस्त्र देऊन अन् श्री दत्तात्रेय आणि मनसादेवी यांच्या मूर्तींचे एकत्रित चित्र भेट देऊन सन्मान केला.

श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांचा सन्मान करतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची ओळख करून देतांना ‘या सनातन संस्थेच्या सर्व आश्रमांतील साधकांना मार्गदर्शन करतात’, असे सांगितल्यावर श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांनी त्यांना ‘माताजी’, असे संबोधत त्यांना नमस्कार केला. ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या कांची (तमिळनाडू) येथे असतात’, असे सांगितले. तेव्हा श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांनी ‘आमच्या आखाड्याची देवता भगवान श्री कार्तिकेय आहे’, असे सांगितले.

या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांना आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांनी ‘आश्रमात नक्की येईन’, असे सांगितले.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान करतांना श्रीमहंत रवींद्र पुरीजी

पू. प्रदीप खेमका आणि त्यांच्या धर्मपत्नी पू. सौ. सुनिता खेमका, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचाही श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांनी सन्मान केला. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेसुद्धा या वेळी उपस्थित होते.

श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांचा परिचय

श्रीमहंत रवींद्र पुरीजी हे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आहेत. या आखाडा परिषदेच्या अंतर्गत १३ आखाडे येतात. यांमध्ये ७ शैव आखाडे, ३ वैष्णव आखाडे, २ उदासीन आखाडा, तसेच १ निर्मल आखाडा आहे. आखाडा परिषदेचे प्रमुख म्हणून पुरीजी महाकुंभमेळ्याच्या आयोजनात साधूंच्या वतीने नेतृत्व करतात. ते निरंजनी आखाड्याचे अध्यक्षही आहेत. त्यांनी वर्ष १९८० मध्ये संन्यास स्वीकारला. श्रीमहंत रवींद्र पुरीजी हे उत्तराखंड राज्यातील हरिद्वारच्या मनसादेवी न्यासाचे अध्यक्षही आहेत.

Leave a Comment