नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी यांची सनातन आश्रम, रामनाथी येथे सदिच्छा भेट

श्री शिवशंकर स्वामीजी (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना श्री. योगेश जलतारे

रामनाथी (गोवा) – नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी आणि त्यांचे भक्त यांनी २९ डिसेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. रोहित साळुंखे यांनी आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर श्री शिवशंकर स्वामीजी यांचा सन्मान ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे संपादक श्री. योगेश जलतारे यांनी पुष्पहार घालून आणि शाल, श्रीफळ अन् भेटवस्तू देऊन केला. आश्रमातील साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत फलकावर स्वत:च्या चुका लिहितात, हे पाहून त्यांना साधकांचे कौतुक वाटले.

श्री शिवशंकर स्वामीजी आणि त्यांचे भक्त यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची माहिती सांगतांना श्री. रोहित साळुंखे

सनातनचा आश्रम पाहून अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी यांनी सांगितले की, सनातन आश्रम पाहून पुष्कळ आनंद झाला. आश्रमात सात्त्विकता आणि शांतता अनुभवायला मिळाली. साधकांची साधना आणि सेवा विशेष आहे. असे आश्रम प्रत्येक जिल्ह्यात असायला हवेत.

Leave a Comment