इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘जैविक महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासू भेट देतांना

इंदूर (मध्यप्रदेश) – ‘किसान कल्याण’ तथा ‘कृषि विकास विभागा’च्या वतीने येथील ढक्कनवाला कुआ परिसरातील ग्रामीण हाट बाजारामध्ये ‘जैविक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जैविक आणि नैसर्गिक शेती यांविषयी तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या मेळ्यामध्ये सनातन संस्थेने आध्यात्मिक ग्रंथांसह आयुर्वेद, देवता, बालसंस्कार, सण-उत्सव, कर्मयोग, बिंदुदाबन, आगामी भीषण आपत्काळातील सुरक्षेची सिद्धता, आचारधर्म, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती इत्यादी विषयांवर आधारित ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते, तसेच हिंदु संस्कृतीचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

१. महोत्सवाचे आयोजक आणि धर्मप्रेमी तथा उद्योजक श्री. राहुल मालविय यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली.

२. या प्रदर्शनाच्या सेवेत नवीन जिज्ञासू सहभागी झाले होते.

३. सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाच्या शेजारी नितेश जसानी यांनी जैविक खताचे प्रदर्शन लावले होते. त्यांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आलेल्या जिज्ञासूंना सनातनच्या प्रदर्शनाला भेट देऊन साहित्य खरेदी करण्यास सांगितले.

४. एका जिज्ञासूने अधिक प्रमाणात ग्रंथ खरेदी केले आणि ‘हे ग्रंथ फार स्वस्त आहेत’, असे सांगितले.

Leave a Comment