कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तक महोत्‍सव २०२४’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथप्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

 

कर्णावती (गुजरात) – येथे ‘नॅशनल बुक ट्रस्‍टच्‍या वतीने ‘अहमदाबाद आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तक महोत्‍सव २०२४’चे आयोजन करण्‍यात आले. या महोत्‍सवात सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथ-प्रदर्शनाचा कक्ष लावण्‍यात आला. या कक्षामध्‍ये धर्म, अध्‍यात्‍म, धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्माचरण, स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन, बालसंस्‍कार, आयुर्वेद, तसेच राष्‍ट्ररक्षण अशी सनातन-निर्मित विविध विषयांवरील ग्रंथसंपदा प्रदर्शित करण्‍यात आली. सनातनच्‍या ग्रंथ-प्रदर्शनाच्‍या कक्षाला जिज्ञासूंचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. हे ‘बुक फेस्‍टिव्‍हल’ ३० नोव्‍हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत पार पडले.

Leave a Comment