छत्रपती संभाजीनगर : येथे २४ ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३ दिवसांच्या ‘बिंदूदाबन उपचार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ वैद्य दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यात त्यांनी प्रारंभी निसर्गोचार आणि बिंदूदाबन उपचारपद्धती यांविषयी माहिती सांगत बिंदूदाबन उपचारपद्धतीमध्ये रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी विशिष्ट बिंदूंचा वापर कसा केला जातो, हे सांगितले.

यामध्ये हाता-पायांच्या तळव्यांवरील, तसेच मान, पाठ, डोके यांवरील बिंदू दाबून रोगाचे निदान आणि उपचार केले जातात, बिंदूदाबन उपचारपद्धत सहज आणि सोपी असल्याने आपण कधीही, कुठेही आणि कुणावरही उपचार करून रुग्णाच्या वेदना तात्काळ न्यून करू शकतो, असे निसर्गोचपारतज्ञ वैद्य दीपक जोशी यांनी सांगितले.

या शिबिरात सनातनचे २५ साधक सहभागी झाले होते. मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार, आम्ल-पित्त, महिलांचे मासिक पाळीशी संबंधित आजार असे विविध आजार असणार्या ५० रुग्णांवर वैद्य दीपक जोशी यांनी उपचार केले. उपाशीपोटी रुग्णांची पडताळणी कशी करावी ? शारीरिक विकारांसाठी सांगितलेले घरगुती उपचार, हात, पाय, मान, पाठ, चेहरा यांवर असणार्या प्रत्येक बिंदूचे कार्य, मणक्यांचा आजार बिंदूदाबनाद्वारे कसा न्यून करावा ? याविषयी वैद्य जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. शिबिरात प्रतिदिन पहिल्या सत्रात तात्त्विक भाग घेत विविध आजार आणि त्या संबंधित शरीरातील विविध बिंदू यांविषयी माहिती सांगितली. दुसर्या सत्रात प्रात्यक्षिक घेऊन त्याचा सराव घेतला.