‘सनातन संस्थेच्या राष्ट्र-धर्म कार्याच्या अंतर्गत विविध सेवांसाठी संगणकीय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सध्या संगणकांची देखभाल, तसेच दुरुस्ती करण्यासाठी साधकसंख्या अपुरी पडत असल्याने साधकांची तातडीने आवश्यकता आहे. सनातनचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनाही या सेवेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी आहे.
या संगणकीय सेवांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
१. ‘टेक्निकल’ आणि ‘नॉन-टेक्निकल’ संगणकीय सेवांचे स्वरूप
अ. संगणकांमध्ये Windows OS, तसेच अन्य Software ‘इन्स्टॉल’ करणे
आ. नादुरुस्त संगणक आणि भ्रमणसंगणक (‘लॅपटॉप’) यांची दुरुस्ती करणे
इ. A4 प्रिंटर, फोटोकॉपी (झेरॉक्स) मशिन, टेलीफोन, माऊस, मोडेम, वाय-फाय राऊटर, पॉवर अॅडॉप्टर, युपीएस् (600VA/1KVA) आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करणे
ई. नेटवर्क केबलिंग करणे (या अंतर्गत Cable pulling, Punching, Crimping करणे आदी सेवा असतात.)
यासाठी ‘नेटवर्किंग’ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसंदर्भातील ज्ञान असावे.
उ. संगणक, तसेच अन्य वस्तू यांची आवक-जावक पहाणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची पडताळणी करणे (या सेवांसाठी केवळ संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.)
संगणकांच्या दुरुस्तीच्या संदर्भात ज्ञान अथवा अनुभव असणारे जे साधक काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ आश्रमात राहून ही सेवा करू शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून संपर्क साधावा. वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी हेसुद्धा स्थानिक साधकांना संपर्क करू शकतात. ही सेवा शिकून घेऊन ती करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल !’
वरील सेवा करू इच्छिणार्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार स्वत:ची माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.