पू. शिवनगिरीकर महाराज यांची सत्पत्नीक सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास सदिच्छा भेट !

डावीकडून श्री. खेमचंद राणे, सौ. शिवनगिरीकर, पू. शिवनगिरीकर महाराज, श्रीमती शैलजा जोशी आणि श्रीमती वसुधा मेहंदळे

छत्रपती संभाजीनगर, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुरा ग्रंथप्रदर्शनास पू. शिवनगिरीकर महाराज यांनी भेट दिली. त्या वेळेस ते म्हणाले की, तुमचे गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) किती महान आहेत ! साधक एवढ्या उन्हातसुद्धा आनंदाने सेवा करत आहेत. गुरुदेवांचे कार्य इतके महान आहे की, माझ्याकडे व्यक्त करायला शब्दच नाहीत. तुमच्या गुरुदेवांचे सगळीकडेच लक्ष असते, असे उद्गार त्यांनी प्रदर्शनास भेट देतांना काढले. त्यांना सनातनचे कार्य आवडल्यामुळे त्यांनी त्यांच्या भक्तांना देण्यासाठी सनातन पंचांग वर्ष २०२५ घेतले आहेत.

Leave a Comment