सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !

डॉ. दीपक जोशी

नाशिक, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – आगामी भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्‍या वेदना न्यून होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिर आयोजित करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील कोठुरे या गावात ३ दिवसांचे निवासी शिबिर पार पडले. सनातनचे साधक आणि निसर्गोपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन आणि ४० रुग्णांवर उपचार केले. पुष्कळ शिबिरार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला.

Leave a Comment