पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन !

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन !

पुणे – विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी प्रथम सत्र परीक्षेच्या ‘ओपन डे’च्या निमित्ताने पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. जयश्री काळे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या, तसेच विविध प्रश्न विचारून त्यांनी स्वत:च्या शंकांचे निरसन करून घेतले.

सौ. जयश्री काळे यांनी सांगितले की, सध्या बहुतेकांचे दैनंदिन जीवन हे धावपळ आणि चिंता यांनी ग्रासलेले आहे, मनःशांती हरवली आहे. ताणतणाव हा आयुष्याचाच एक भाग झाला आहे. शाळेत जाणारे अगदी लहान मूल असू दे किंवा कुणी वयोवृद्ध असू दे, आज प्रत्येकालाच दैनंदिन जीवनात ताणतणावाचा सामना करावा लागतो. आपण शिक्षण घेतांना इतिहास, भूगोल, गणित असे विषय शिकतो; पण आनंद कसा मिळवायचा ?, हे कुठेच शिकवले जात नाही. हे सर्व साधनेने शक्य होत असून परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनाच करायला हवी. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म !

‘हा कार्यक्रम पुष्कळ चांगला होता. मार्गदर्शनानुसार कृती करण्याचा प्रयत्न करू’, असे मत काहींनी व्यक्त केले.

Leave a Comment