अनुक्रमणिका
- १. सनातनमध्ये आल्यावर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी हात पकडून मला सनातनमध्ये आणले’, या भावाने साधना करणारे श्री. सांतप्पा गौडा !
- २. श्री. सांतप्पा गौडा यांची गुणवैशिष्ट्ये
- २ अ. सतत आनंदी
- २ आ. साधकांचे आधारस्तंभ बनलेले सांतप्पामामा !
- २ इ. मामांनी साधकांना व्यष्टी साधनेचे प्रयत्न करण्यासाठी साहाय्य केल्यामुळे साधकांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यात पालट होणे
- २ ई. सेवेची तीव्र तळमळ
- २ उ. स्वतःच्या कुटुंबियांकडून साधना करून घेणे
- २ ऊ. ‘सनातन हेच माझे कुटुंब’
- २ ए. पू. रमानंद गौडा यांच्याप्रती भाव
- २ ऐ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
- ३. श्री. सांतप्पामामांना आलेल्या अनुभूती
- ३ अ. पावसाळ्यात मामा सेवेला निघाल्यावर पाऊस पडायचा थांबणे आणि ‘वरुणदेवच काळजी घेतो’, अशी मामांना अनुभूती येणे
- ३ आ. दुचाकी गाडीवरून खाली पडल्यावर ‘स्वतःभोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे संरक्षककवच होते’, याची अनुभूती घेणारे सांतप्पामामा !
- ३ इ. नदी ओलांडून जातांना सांतप्पामामा अकस्मात् खाली पडणे; पण ते पाण्यात न पडता बाजूला पडणे आणि ‘देव सतत समवेत असून तोच काळजी घेतो’, असे मामांनी सांगणे
१. सनातनमध्ये आल्यावर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी हात पकडून मला सनातनमध्ये आणले’, या भावाने साधना करणारे श्री. सांतप्पा गौडा !
‘पुत्तुर (जिल्हा दक्षिण कन्नड) येथील श्री. सांतप्पा गौडा (मामा) यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे नोकरी केली. निवृत्त झाल्यानंतर त्यांना एकाकी वाटायचे. मनातील विचार सांगण्यासाठी त्यांना जवळचे कोणी नव्हते. नंतर ते एका संप्रदायाच्या माध्यमातून साधना करू लागले. पुढे त्यांना सनातनच्या माध्यमातून योग्य साधना कळली. तेव्हा त्यांना वाटले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच माझा हात पकडला आणि मला सनातनमध्ये आणले आहे.’ त्यांच्या घरी पुष्कळ अडचणी आणि पूर्वजांचा त्रास होता. साधना चालू केल्यावर आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप केल्यावर त्यांच्या सर्व अडचणी दूर झाल्या.
२. श्री. सांतप्पा गौडा यांची गुणवैशिष्ट्ये
२ अ. सतत आनंदी
सांतप्पामामा सतत आनंदी असतात.
२ आ. साधकांचे आधारस्तंभ बनलेले सांतप्पामामा !
पुत्तुर येथील साधकांना काही अडचण आली, तर ते मामांचे मार्गदर्शन घेतात. मामा त्यांना भावाच्या स्तरावर मार्गदर्शन करतात. श्री. सांतप्पामामा म्हणजे पुत्तुर येथील साधकांचा आधारस्तंभच आहेत. ‘साधकांना साहाय्य करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे’, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत.
२ इ. मामांनी साधकांना व्यष्टी साधनेचे प्रयत्न करण्यासाठी साहाय्य केल्यामुळे साधकांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यात पालट होणे
सांतप्पामामा ज्यांना साधना सांगतात, त्या सर्व व्यक्ती साधनेला आरंभ करतात. त्यांच्या भागातील एक साधक व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत नव्हता. सांतप्पामामांनी त्या साधकाच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यास आरंभ केला. तेव्हा मामा प्रतिदिन त्या साधकाला भ्रमणभाष करून ‘साधनेचे प्रयत्न कसे करायचे ? ते करण्यात काही अडचण आहे का ?’, याविषयी बोलायचे. नंतर त्या साधकामध्ये पुष्कळ पालट झाले. याविषयी त्याला विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘सांतप्पामामा प्रतिदिन माझा आढावा घ्यायचे. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले !’’ अन्य ३ – ४ साधकांमध्येही असे पालट झाले आहेत.
२ ई. सेवेची तीव्र तळमळ
सांतप्पामामांचे वैशिष्ट्य म्हणजे या वयातही ते प्रतिदिन सेवेसाठी जातात. ‘जिज्ञासूंना संपर्क करणे, नियतकालिकाचे वर्गणीदार करणे, नूतनीकरण करणे, विज्ञापने आणणे, तसेच सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे’ आदी सर्व सेवा ते अजूनही करतात. ते सतत सेवारतच असतात. वय अधिक असूनही घरी न थांबता ते एखाद्या साधकाचे साहाय्य घेऊन सेवेसाठी जातात. देवावर श्रद्धा आणि सेवेची तीव्र तळमळ असल्याने कितीही कठीण परिस्थिती असली, तरी ते सेवा करण्यासाठी बाहेर जातात. या उतारवयातही ते युवकांसारखी सेवा करतात आणि कोणतीही सेवा दिली, तरी ते ती सेवा परिपूर्ण करतात.
२ उ. स्वतःच्या कुटुंबियांकडून साधना करून घेणे
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुत्तुर भागात एक फेरी होती. त्या वेळी तेथे नृत्य सादर करण्याची सेवा होती. फेरीनंतर एका आठवड्याने सांतप्पामामा यांच्या नातीचा (पूर्वाश्रमीची कु. विद्या गौडा, वय २९ वर्षे) विवाह होता. तेव्हा मामांनी तिला ‘प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्तच्या सेवेचा लाभ करून घ्यायला हवा’, असे सांगून तिला जन्मोत्सव फेरीमध्ये नृत्याची सेवा करायला लावली.
२. मामा त्यांचा मुलगा (श्री. गंगाधर गौडा, वय ४८ वर्षे) आणि सून (सौ. यशोदा गौडा, वय ३८ वर्षे) या दोघांकडून अर्पणाच्या माध्यमातून त्याग करून घेतात. ते मध्ये मध्ये कुटुंबियांना आश्रमात घेऊन जातात. त्यामुळे त्यांच्यामध्ये साधनेची आवड निर्माण झाली आहे.
२ ऊ. ‘सनातन हेच माझे कुटुंब’
‘सनातन हेच माझे कुटुंब’, असा भाव असल्याने आता मामांना कधीच एकटेपणा वाटत नाही.
२ ए. पू. रमानंद गौडा यांच्याप्रती भाव
१. एकदा सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा पुत्तुर केंद्रात जाणार होते. त्या कालावधीत सांतप्पामामा अयोध्येला जाणार होते. त्यासाठी त्यांनी काही सहस्र रुपयेही पैसे भरले होते; पण ‘संत घरी येणार’; म्हणून त्यांनी अयोध्येला जाण्याचे रहित केले. ‘आपल्या भागात साक्षात् देव येत आहे, तर मी कशाला अयोध्येला जाऊ ?’, असा त्यांचा भाव होता.
२. मामांना जेव्हा पू. अण्णांना भेटावेसे वाटते, तेव्हा ते कुटुंबियांना घेऊन त्यांना भेटण्यासाठी जातात. ‘पुढील साधनेसाठी मी काय करू ?’, याविषयी ते पू. अण्णांचे मार्गदर्शन घेतात.
२ ऐ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
मामा म्हणतात, ‘‘मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर माझी प्रत्येक अडचण सुटते. प.पू. गुरुदेव प्रत्येक क्षणी माझ्या समवेत असतात. ‘ते माझे रक्षण करणारच आहेत’, अशी श्रद्धा ठेवून मी सेवा करण्यासाठी जातो.’’ हे सांगतांना त्यांची भावजागृती होते.
३. श्री. सांतप्पामामांना आलेल्या अनुभूती
३ अ. पावसाळ्यात मामा सेवेला निघाल्यावर पाऊस पडायचा थांबणे आणि ‘वरुणदेवच काळजी घेतो’, अशी मामांना अनुभूती येणे
पावसाळ्याच्या कालावधीत मामा सेवेला बाहेर जायचे. तेव्हा पुष्कळ पाऊस पडत असायचा; परंतु मामा सेवेला बाहेर निघाले की, पाऊस थांबायचा. ते सेवेच्या ठिकाणी पोचले की, पाऊस परत चालू व्हायचा. मामा एका घरातून दुसर्या घरात जात असतांना पाऊस थांबायचा. ‘सेवेच्या तळमळीमुळे वरुणदेवच कृपा करतो’, अशी त्यांना अनुभूती यायची.
३ आ. दुचाकी गाडीवरून खाली पडल्यावर ‘स्वतःभोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे संरक्षककवच होते’, याची अनुभूती घेणारे सांतप्पामामा !
एकदा मामा दुचाकी गाडीवरून एका चढावरून जात होते. तेव्हा अकस्मात् गाडीवरील नियंत्रण सुटून दुचाकी गाडी घसरली आणि मामा रस्त्यावर पडले. गाडी त्यांच्या अंगावरच पडली. हे दृश्य पाहून बाकीचे लोक पुष्कळ घाबरले. लोकांनी येऊन अंगावर पडलेली गाडी उचलली आणि मामांची विचारपूस केली. तेव्हा मामा म्हणाले, ‘‘मला काहीच लागले नाही.’’ मामांना काहीच झाले नव्हते आणि केवळ त्यांच्या कपड्यांना धूळ लागली होती. खरे पहाता तो मोठा अपघात होता; परंतु मामांना काहीच झाले नाही. त्या वेळी ‘ईश्वर सतत सोबत असतो’ आणि ‘गुरुदेवांचे संरक्षककवच माझ्याभोवती आहे’, हे अनुभवून त्यांची पुष्कळ भावजागृती होत होती.
३ इ. नदी ओलांडून जातांना सांतप्पामामा अकस्मात् खाली पडणे; पण ते पाण्यात न पडता बाजूला पडणे आणि ‘देव सतत समवेत असून तोच काळजी घेतो’, असे मामांनी सांगणे
वर्ष २०२४ च्या गुरुपौर्णिमेच्या सेवेला जात असतांना मामा एक नदी ओलांडून जात होते. त्या वेळी नदीला पाणी होते. तेव्हा अकस्मात् मामा खाली पडले; पण ते पाण्यात न पडता बाजूला पडले आणि त्यांना कोठे लागले नाही. पाण्यात पडले असते, तर ते वाहून जाऊ शकले असते. त्या वेळीही ‘देव सतत माझ्या समवेत असतो आणि तोच माझी काळजी घेतो’, अशी अनुभूती आल्याचे मामांनी सांगितले.
सांतप्पामामांशी बोलतांना मला पुष्कळ आनंद वाटत होता आणि ‘मी लहान मुलाशी बोलत आहे’, असे मला वाटत होते.’
– सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४३ वर्षे), मंगळुरू, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (६.८.२०२४)
(‘हे लिखाण श्री. सांतप्पा गौडा संतपदी विराजमान होण्यापूर्वीचे असल्याने लिखाणात त्यांच्या नावाआधी ‘पू.’ असे लावलेले नाही.’ – संकलक)