धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन

व्याख्यानाला उपस्थित विद्यार्थी

धरुहेडा (हरियाणा) – सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘ऋषि वर्ल्ड स्कूल’ या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याचा लाभ १ ली ते ५ वीपर्यंतच्या २६० विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी यांनी ‘आदर्श बालक कसे बनावे ?, त्यासाठी काय करावे ?, राष्ट्र्रध्वजाचा मान कसा ठेवावा ?, आदर्श दिवाळी कशी साजरी करावी ?, हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस कसा साजरा करावा ?, ‘मम्मी-डॅडी’ ऐवजी आई-बाबा का म्हणावे ?’, यांविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बबिता शर्मा यांनी ‘अशी माहिती मोठ्या मुलांना देण्यासाठी परत या’, अशी विनंती केली.

Leave a Comment