लक्ष्मीपूजन कधी आणि कोणत्या दिवशी करावे ?

यंदाच्या वर्षी ‘लक्ष्मीपूजन कधी करावे ?’, याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात जे निर्णय सांगितले आहेत, त्यानुसार लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावे ? हे येथे देत आहोत. लक्ष्मीपूजन हे प्रदोषकाळी, म्हणजेच सूर्यास्ताच्या नंतर करावे; पण प्रत्येक गावातील आणि शहरातील सूर्याेदय अन् सूर्यास्त यांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने कोणत्या गावी आणि शहरी कोणत्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, हे पुढे देत आहोत.

३१ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन करावयाचे जिल्हे

अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, धुळे, पुणे, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, धाराशिव, पणजी, कर्णावती, वडोदरा, बेंगळुरू, बेळगाव, गोकर्ण, हुब्बळ्ळी, विजापूर आणि धारवाड.

१ नोव्हेंबर या दिवशी लक्ष्मीपूजन करावयाचे जिल्हे

अकोला, अमरावती, नागपूर, परभणी, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, बिदर, गुलबर्गा, भोपाळ, ग्वाल्हेर, भाग्यनगर आणि निजामाबाद.

टीप : ज्या राज्यांचा या चौकटीत उल्लेख नाही, त्यांनी स्थानिक पंचांगात दिल्यानुसार लक्ष्मीपूजन करावे.

– श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन वेदपाठशाळा, गोवा (२४.१०.२०२४)

Leave a Comment