सनातन संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवात विविध माध्यमांतून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे करण्यात आला धर्मप्रसार !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत उत्तरप्रदेशातील कानपूर, अयोध्या, भदोही, तसेच बिहार राज्यातील समस्तीपूर आणि गया येथे प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनांमधून देवी पूजनाशी संबंधित शास्त्रीय माहिती देण्यात आली.

यासमवेतच उत्तरप्रदेशच्या जौनपूर, गाझीपूर, भदोही आणि वाराणसी, तसेच बिहारच्या पाटलीपुत्र, हाजीपूर, दानापूर, समस्तीपूर, मुझफ्फरपूर अन् गया येथे सनातन संस्थेचे ग्रंथ, तसेच धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या दोन्ही उपक्रमांचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. हाजीपूर (बिहार) येथील सनातनचे हितचिंतक श्री. सुजीत सोनी यांच्या पत्नी सौ. संगीता सोनी यांनी कन्यापूजनाच्या निमित्ताने कुमारिकांना भेट देण्यासाठी सनातन निर्मित लघुग्रंथ खरेदी केले. या दांपत्याचे नवरात्रीचे उपवास हाेते, तरीही त्यांनी ६ दिवस ग्रंथ प्रदर्शनात सेवा केली.

२. अनेक जिज्ञासूंनी सांगितले की, ते सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन कधी लागणार ?, याची प्रतीक्षा करत असतात.

Leave a Comment