माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते पुणे येथील कक्षाचे उद्घाटन !

पुणे, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – शारदीय नवरात्र ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाले. या निमित्ताने पुणे येथील जागृत देवस्थान श्री चतुःश्रृंगीदेवी येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले.


याप्रमाणेच चिंचवड (आकुर्डी) येथील श्री भवानी माता मंदिर येथेही सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. येथील ‘गुरु मोटर्स’चे मालक श्री. सचिन साकोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही त्यांच्या दुकानासमोरील जागा त्यांनी कक्षासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. या वेळी ‘सनातन पंचांग २०२५’ त्यांना भेट देण्यात आले. सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि आकुर्डी येथे लावण्यात आलेले ग्रंथ प्रदर्शन हे ११ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण दिवस खुले ठेवण्यात आले होते. भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते.

या वेळी दिलीप देशमुख म्हणाले की, सनातनचे साधक सर्व लोकांपर्यंत सनातन धर्माचे महत्त्व पोचावे, समाजाचे प्रबोधन व्हावे, यासाठी निःस्वार्थ भावाने हे कार्य करत आहेत. माझी प्रकृती ठीक नसतांनाही मी उद्घाटनासाठी यायचे ठरवले आणि माझी प्रकृती बरी झाली, ही देवीची कृपाच आहे. विविध विषयांवरील सनातनचे ग्रंथ अतिशय प्रबोधनपर आणि मार्मिक आहेत. सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.