नामस्मरणाने विद्यार्थ्यांचा तणाव न्यून होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते !- सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

भदोही (उत्तरप्रदेश) येथे ‘भारत विकास परिषदे’च्या वतीने ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन !

‘संस्कार शिबिरा’ला उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक

भदोही (उत्तरप्रदेश) – व्यक्तीला ९० ते ९५ टक्के मानसिक तणाव हा अंतर्गत कारणांमुळे येतो. मनाच्या कमकुवतपणामुळे तणाव निर्माण होतो. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्तरासमवेतच आध्यात्मिक स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ध्यानामुळे मन सक्षम होऊ शकते. नामस्मरण करणे, ही कलियुगातील एकमेव साधना आहे. नामस्मरण केल्याने मन सशक्त होते, तसेच विद्यार्थ्यांचा मानसिक ताण न्यून होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी विद्यार्थ्यांना केले.

सौ. प्राची जुवेकर

‘सध्या विद्यार्थ्यांसाठी तणाव ही विशेष समस्या झाली आहे. त्यामुळे काही विद्यार्थी आत्महत्येसारखे गंभीर पाऊलही उचलतांना दिसतात. याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे’, यासाठी ‘भारत विकास परिषदे’च्या भदोही शाखेचे अध्यक्ष श्री. पंकज बरनवाल यांच्या वतीने चौरी बाजार येथील ‘अनुराग पब्लिक स्कूल’मध्ये ‘संस्कार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सौ. जुवेकर यांना मार्गदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ घेतला.

Leave a Comment