श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ व श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी स्वीकारला पुरस्कार
पॅरिस (फ्रान्स) – अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत झटणारे, साधनेविषयी दिशादर्शन करून जगभरातील साधकांचे जीवन आनंदमय करणारे, विज्ञानयुगात सोप्या सुलभ भाषेत अध्यात्माचा प्रसार करून समाजाला दिशादर्शन करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ५ जून २०२४ या दिवशी फ्रान्सच्या सीनेटमध्ये (संसदेमध्ये) ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डॉमिनिक थिओफिल, मेहेंदीपूर बालाजी ट्रस्टचे श्री नरेश पुरी महाराज, ‘संस्कृती युवा संस्थे’चे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा आणि फ्रेंच संसदेचे सदस्य फ्रेडरिक बुवेल यांच्या हस्ते भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘संस्कृती युवा संस्थे’ने या पुरस्कारासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची निवड केली होती.
या वेळी ‘संस्कृती युवा संस्थे’चे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा म्हणाले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भारतीय संस्कृतीसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सनातन संस्थेने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजात जागरूकता अन् सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य कार्याचा सन्मान ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केल्याविषयी सनातन संस्था ही ‘संस्कृती युवा संस्था’ आणि संस्थेचे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा यांच्याप्रती कृतज्ञ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासम उच्च पातळीचे संत हे पुरस्कार आणि मानसन्मान यांच्या पलीकडे गेलेले असले, तरी त्यांचा झालेला हा सन्मान म्हणजे त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य अध्यात्मकार्याचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राविषयी केलेले अलौकिक संशोधनकार्य आणि ग्रंथलेखन, तसेच अखिल मानवजातीला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचाच आज एकप्रकारे गौरव झाला आहे, असे आम्ही मानतो.’
– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.
Sachchidananda Parabrahman Dr Jayant Athavale (Founder, @SanatanSanstha) conferred the 11th ‘Bharat Gaurav’ Award by Sanskriti Yuva Sanstha (@BGAoffc) for His contributions to the spread of Spirituality and the uplift of Nation and Dharma.
Sachchidananda Parabrahman Dr… pic.twitter.com/J4TGToI96I
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) June 6, 2024
तरुण भारत, सकाळ, हिंदुस्तान पोस्ट, बेळगाव केसरी वेबपोर्टल, सह्याद्री सायं दैनिक, राजुरेश्वर, City News, कला दर्पण news, नवराष्ट्र, विश्वात्मक लोकस्वामी वार्ता, दैनिक महाविदर्भ, दैनिक लोकशाही वार्ता, अस्त्र, दैनिक दायित्व, दैनिक संध्या, लोकमान्य सांजवार्ता, pcbtoday.in, pentimes.co.in, दैनिक पुणे प्रहार, ललकार, लोकसंवाद 18 news, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क या प्रसिद्धी माध्यमांवर मराठी भाषेत ही वार्ता प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच हिन्दी आणि इंग्रजी मधील काही नियतकालिकांमध्ये या बातमीला प्रसिद्धी देण्यात आली.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना घोषित झाला ११ वा ‘भारत गौरव पुरस्कार !’
(४ जून २०२४)
‘संस्कृती युवा संस्थे’च्या वतीने ५ जूनला फ्रान्सच्या संसदेत होणार सम्मान !
जयपूर (राजस्थान) – भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांच्या जागतिक प्रसारासाठी केलेल्या अद्वितीय योगदानासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ११ व्या ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. ‘संस्कृती युवा संस्थे’च्या वतीने ५ जून २०२४ या दिवशी फ्रान्समधील सिनेटमध्ये (संसदेत) हा पुरस्कार देण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी घोषित केले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हा पुरस्कार स्वीकारतील.
भारतीय संस्कृती आणि समाजाच्या उन्नतीसाठी अद्वितीय योगदानासाठी सन्मान !
२८ वर्षांपासून भारतीय संस्कृती आणि समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित ‘संस्कृती युवा संस्थे’ने यंदाच्या प्रतिष्ठित ‘भारत गौरव पुरस्कारा’साठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची निवड केली आहे. हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्यांसाठी, आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आणि सांस्कृतिक संरक्षणातील अद्वितीय योगदानासाठी दिला जात आहे.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना सन्मानित करण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक मान्यवर उपस्थित असतील आणि हा सोहळा भारतीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा उत्सव साजरा करण्याचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनेल.
‘भारत गौरव पुरस्कार’ सोहळा या पूर्वी ‘युनायटेड किंगडम हाऊस ऑफ कॉमन्स’ (ब्रिटन), संयुक्त राष्ट्र्रे आणि अटलांटिस आणि दुबई, अशा प्रतिष्ठित ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या वेळी फ्रान्समधील सिनेटमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात भारत आणि भारतीय जनसमुहातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित केले जाते, जे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.