बिहारमधील मुझफ्फरपूर, गया, समस्तीपूर, सोनपूर येथील विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजन

‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुझफ्फरपूर (बिहार) – सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत संस्थेतर्फे मुझफ्फरपूर आणि गया येथील ‘चेंबर ऑफ कॉमर्स’मधील व्यावसायिक, समस्तीपूर येथील कृष्णा विद्यालयाचे शिक्षक अन् ‘आर्.एस्.बी. इंटर विद्यालया’चे शिक्षक, तसेच गया येथील ‘अलाईड इंटरनॅशनल स्कूल’मधील शिक्षक,‘मुझफ्फरपूर बार असोशिएशन’चे अधिवक्ता, हाजीपूरमधील ‘सॉफ्टनेट कोचिंग सेंटर’ आणि सोनपूरचे एस्.पी.एस्. विद्यालय अशा विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी तणावाची कारणे, तणावामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक स्तरावर होणार्‍या व्याधी, तसेच त्यावरील उपाय यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.

क्षणचित्रे

१. गया येथील ‘चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वतीने सनातन संस्थेचा सन्मान करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, ‘‘सर्व व्यापारीवर्गाला या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता होती. या कार्यक्रमामुळे आम्हा सर्वांचे ज्ञानवर्धन झाले.’’

२. विषय समजावून सांगण्यासाठी ‘स्लाईड’चा (चित्रपट्ट्यांचा) वापर करण्यात आला. त्याचे अनेकांनी छायाचित्रे घेतली.

३. प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थितांनी त्यांच्या मनावरील ताणाविषयी सांगून त्यावर मार्गदर्शन घेतले.

४. अशा प्रकारचे मार्गदर्शन अन्य ठिकाणीही करण्याची आवश्यकता उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment