सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा, ८ मे (वार्ता.) – सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानिक ‘चन्नावार-ई-विद्यामंदिर, येळाकेळी’ येथे नुकतेच ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे ?’, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दिनेश चन्नावार, उपमुख्याध्यापिका पूजा कपूर, तसेच ४० हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी ‘तणाव म्हणजे काय ?’, तणावाची कारणे, तणावाचे मानवी जीवनावर होणारे विविध परिणाम, मनुष्याचे मन कसे कार्य करते ? तणावमुक्त होण्यासाठी कोणते उपाय करावे, तणावमुक्तीसाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करावे ? यांविषयी उपयुक्त माहिती दिली, तसेच तणावमुक्ती करून आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने नामस्मरण आणि योगाभ्यास करण्याचे महत्त्वही त्यांनी या वेळी विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता यांनी केले.