१. डॉ. सीताकांत ना. कामत, पणजी, गोवा : ‘आश्रम पाहून आनंद झाला. समाधान वाटले. येथे आल्यावर चिदानंदाची अनुभूती आली. आपले सेवाकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’
२. श्री. आदर्शय्या बेविनकोप्पमठ (दक्षिण भारत रथ योजना प्रमुख, एकल अभियान) कर्नाटक : ‘आश्रमदर्शनाने आमचे शरीर पवित्र झाल्यासारखे वाटले. येथील व्यवस्था आणि येथील सर्व साधकांचा सेवाभाव सर्व पुष्कळ आनंददायक होते.’
३. श्री. मंजु भार्गव (जिल्हा संचालक, बजरंग दल) तुमकुरू, कर्नाटक : ‘सनातन धर्माचे अद्भुत दर्शन झाले. आश्रम पहायला अन्य हिंदु धर्मियांना बोलावून घेऊन येण्याचा संकल्प करतो.’
४. श्री. कुमारस्वामी (मुख्याध्यापक), कुणिगल, कर्नाटक : ‘आश्रम स्वर्गातील वर्णनासारखा वाटला. ‘आमच्या सभोवतालच्या प्रदेशात आणि आमच्या गावात आश्रमासारखे वातावरण असावे’, असे वाटले.’
५. अधिवक्ता वसंता, बेळ्तंगडी, दक्षिण कन्नड, कर्नाटक : ‘आश्रमात असतांना ‘मी सर्व प्रकारच्या दाबांपासून मुक्त आहे’ आणि ‘मी साक्षात् देवासमोर उभा आहे’, असे मला जाणवले.’
६. श्री. एम्.जे. शेट्टी (उद्योगपती), मंगळुरू, दक्षिण कन्नड, कर्नाटक :
अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला चौथ्यांदा या आश्रमात येण्याची संधी मिळाली. आश्रमातील सकारात्मकतेमुळे (चैतन्यामुळे) ‘येथे येणे’, हा एक आनंददायी अनुभव असतो.
आ. ‘या आश्रमाला भेट देणारे जिज्ञासू हे साधक आणि संत होवोत अन् हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होवो’, अशी माझी इच्छा आहे.’
७. अधिवक्त्या (श्रीमती) रूपा धवलगी (अध्यक्ष, उत्तर हुब्बळ्ळी, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद), कर्नाटक : ‘आश्रम पहातांना ‘मी आश्रमात नसून एका मंदिरात आले आहे’, असे मला वाटले. आश्रमाचे व्यवस्थापन पुष्कळ चांगले आहे. साधना आणि अध्यात्म यांविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद !’
८. अधिवक्ता ए.के. अनिल कुमार, भद्रावती, कर्नाटक : ‘आश्रमात सर्वत्र शांततापूर्ण वातावरण आहे.’
९. श्री. संदीप के. एन्. (राज्य प्रवक्ता, हिंदु राष्ट्र सेना), कर्नाटक :
अ. ‘आश्रमात शक्तीशाली ऊर्जा कार्यरत आहे.
आ. माझे शरीर आणि आत्मा आनंदी झाले.
इ. ‘मी प्रत्यक्ष देवालाच भेटलो’, असे मला जाणवले.’
१०. श्री. श्रीधर भट (लोकहितम् फाऊंडेशन), बेंगळुरू, कर्नाटक : ‘आश्रम पहातांना मला पुष्कळ चांगले वाटले. येथे मला दैवी शक्तीचे अस्तित्व अनुभवायला मिळाले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)