१. महाराष्ट्रातील मान्यवरांचे अभिप्राय
अ. कोल्हापूर
१. श्री. संदीप बाळासाहेब पारळे (श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), आजरा, जिल्हा कोल्हापूर.
‘या प्रदर्शनात मला दैवी सूक्ष्म कण प्रत्यक्ष बघायला मिळाले.’
२. श्री. नाथ नारायण देसाई (तालुका महासचिव, भाजप), तालुका आजरा, कोल्हापूर, महाराष्ट्र.
‘हे प्रदर्शन मला नाविन्यपूर्ण वाटले.’
आ. सातारा
१. श्री. राजेंद्र शंकर शिंदे (शहर प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), महाबळेश्वर, सातारा.
‘असे प्रदर्शन मी कधी पाहिले नाही. हे प्रदर्शन पाहून मला आश्चर्य वाटले.’
२. अधिवक्ता दत्तात्रय सणस (प्रमुख कार्यवाह, हिंदू महासभा, महाराष्ट्र कार्यकारिणी), सातारा
‘हे प्रदर्शन पाहून मला धन्य वाटले.’
इ. जळगाव
१. श्री. अनिल सोमा चौधरी (जिल्हा कार्यकारी अध्यक्ष, श्री योगवेदांत सेवा समिती)
‘प्रदर्शन पाहून ‘नामजप आणि साधना हीच संपत्ती आहे’, याची मला जाणीव झाली.’
१ ई. अमरावती
१. श्री. अनुप प्रमोद जयस्वाल (सचिव, देवस्थान सेवा समिती विदर्भ)
‘हे प्रदर्शन पाहिल्यावर माझ्या ज्ञानात भर पडली आणि माझी अध्यात्मातील रुची वाढली.’
२. राजस्थानमधील मान्यवरांचे अभिप्राय
अ. महंत श्री. दीपक वल्लभ गोस्वामी (संस्थापक आणि अध्यक्ष, ज्ञानम् फाउंडेशन), जयपूर
‘सूक्ष्म दृष्टीने संचरण करून आपल्या आतील चेतना कशी जागृत करावी ?’, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.’
३. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
अ. डॉ. रितेश अ. शुक्ला, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई.
१. ‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमामध्ये येऊन मला पुष्कळ सात्त्विक वातावरण अनुभवायला मिळाले. हा अनुभव अकल्पनीय होता.
२. सनातन संस्थेची स्वयंशिस्त अनुकरणीय आहे. ‘हीच शिस्त जगभरात सगळीकडे निर्माण व्हावी’, असे मला वाटले.
३. ‘जीवनात होणारे त्रास न्यून करून जीवन सुरळीत कसे करता येईल ?’, हे मला येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.’ (३१.५.२०२२)
आ. सौ. अर्चना आनंद मसुरकर, करंजाडे, पनवेल.
१. ‘मला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर प्रसन्न आणि शांत वाटले.
२. ‘आश्रमातील साधक आणि साधिका कुटुंबाप्रमाणे आनंदी रहातात’, हे पाहून मला पुष्कळ आनंद झाला.
३. ‘आपल्या चुका शोधून त्या सुधारण्याचा प्रयत्न करणे’, ही संकल्पना मला पुष्कळच आवडली. ‘हा गुण आमच्यातही यावा’, यासाठी आम्ही प्रयत्न करू.’ (३१.५.२०२२)
इ. सौ. अपूर्वा तौर, कुर्ला (पूर्व), मुंबई.
१. ‘देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला भेट देऊन मला पुष्कळ छान वाटले.
२. मी स्वभावदोष-निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करीन, साधना नियमितपणे करीन आणि इतरांना सांगीन.
३. मी सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ यांविषयीची माहिती इतरांना सांगीन.’ (३१.५.२०२२)