सनातनचा आश्रम म्हणजे धर्मकार्य करण्याचे प्रेरणास्थान ! – सौ. कमलताई माळी

श्री. जंबुराव माळी (डावीकडे) यांना प्रसाद देतांना श्री. संतोष देसाई (उजवीकडे), शेजारी श्री. श्रीकृष्ण माळी
श्री. जंबुराव माळी (डावीकडे) यांना प्रसाद देतांना श्री. संतोष देसाई (उजवीकडे), शेजारी श्री. श्रीकृष्ण माळी

 

प्रखर हिंदुत्ववादी श्री. श्रीकृष्ण माळी
यांच्या परिवारातील आणि त्यांच्या परिचयाच्या
३५ जणांची सनातनच्या मिरज येथील आश्रमास सदिच्छा भेट !

मिरज – गेले अनेक दिवस आश्रमात येण्याची इच्छा होती. आश्रमातील शिस्त, नियोजन, पावित्र्य, साधकांचा त्याग हे सर्व घेण्यासारखे आहे. सनातनचा आश्रम म्हणजे धर्मकार्य करण्याचे प्रेरणास्थान आहे, असे गौरवोद्गार प्रवचनकार सौ. कमलताई माळी (श्री. श्रीकृष्ण माळी यांच्या मातोश्री) यांनी काढले. सांगली येथील माळी समाजाचे प्रमुख, श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि प्रखर हिंदुत्ववादी श्री. श्रीकृष्ण माळी यांच्या परिवारातील आणि त्यांच्या परिचयाच्या ३५ जणांनी १९ जानेवारीला सनातन संस्थेच्या ब्राह्मणपुरी येथील आश्रमास भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या. यात ३२ महिलांचा समावेश होता.

कु. प्रतिभा तावरे, श्री. संतोष देसाई, तसेच अन्य साधकांनी आश्रमात चालणार्‍या विविध सेवांविषयी सर्वांना अवगत केले. अनेक महिलांनी आश्रमातील भोजनगृहातील नियोजन, वस्तू ठेवण्याची पद्धत आवडली असून त्याप्रमाणे घरात तशी कृती करणार असल्याचे सांगितले. अनेकांनी कुलदेवीचा नामजप आता नियमित करणार असल्याचे सांगितले. बहुतांश महिलांनी ध्यानमंदिरात नामजप चांगला होतो, येथे प्रसन्न वाटते, असे सांगितले. या वेळी श्री. जंबुराव माळी (श्री. श्रीकृष्ण माळी यांचे पिताश्री), सौ. निर्मला विक्रांत माळी, श्रीमती लीलाबाई मनोहर माळी, कु. हर्षदा अनिल कुर्ले, सौ. अंजना राजाराम माळी, सौ. कुसुम तुकाराम माळी यांसह अन्य उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया

१. श्री. श्रीकृष्ण माळी

आश्रम पाहिल्यावर सर्व सोडून आश्रमात येऊन रहाण्याची इच्छा होत आहे.

२. सौ. निर्मला माळी

येथे आल्यावर योग्य संस्कार कसे करावेत, तसेच भोजनगृहातील अनेक गोष्टी शिकता आल्या.

 

क्षणचित्रे

१. श्री. श्रीकृष्ण माळी हे सर्व महिलांना आश्रमात येण्यास सोपे जावे यांसाठी बस करून घेऊन आले होते. श्री. श्रीकृष्ण माळी यांचे आजोबा आश्रमावर कोणत्याही प्रकारचा ताण नको; म्हणून ते येतांना अल्पाहार समवेत घेऊन आले.

२. महिलांनी विषय ऐकल्यावर लगेचच धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची सिद्धता दर्शवली.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment