सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धत घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी ‘होमिओपॅथी स्वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !
संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे
डोकेदुखीची कारणे
अ. मद्यपान, धूम्रपान करणे.
आ. अतीमांसाहार करणे.
इ. वारंवार जेवणाची वेळ टळणे किंवा जेवण चुकणे.
ई. प्रदीर्घ खोकणे, शिंका येणे, रडणे.
पुढील परिस्थितीत तातडीने वैद्यकीय साहाय्य घ्यावे.
अ. अचानक तीव्र डोकेदुखी चालू होणे.
आ. मार लागल्यानंतर डोकेदुखी चालू होणे.
इ. डोकेदुखीच्या बरोबर आकडी (fits/seizures) येणे.
वरील ३ स्थिती वगळता अन्य सामान्य डोकेदुखी असतांना कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, कोणते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.
१. बेलाडोना (Belladona)
१ अ. कपाळ आणि कानशिले या ठिकाणी जडपणा जाणवणे, तसेच ठुसठुसल्याप्रमाणे (throbbing) वेदना होणे
१ आ. प्रकाश, गोंधळ, हालचाल करणे, पडून रहाणे, केस कापणे यांनंतर डोकेदुखी वाढणे
१ इ. डोकेदुखीमुळे सतत कण्हणे
१ ई. चेहरा लालसर (flushed) होणे, डोके गरम होणे; डोळ्यांची जळजळ होणे
१ उ. डोके उशीमध्ये खुपसणे, डोके मागे ओढणे, गडबडा लोळणे
१ ऊ. अंधार्या खोलीमध्ये बरे वाटणे
२. ॲकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)
२ अ. डोके जणू आवळल्याप्रमाणे, सर्व बाजूंनी पट्टयाने आवळल्याप्रमाणे दुखणे
२ आ. जणू कवटीमधील सर्वकाही कपाळामधून बाहेर पडेल, असे वाटणे
२ इ. डोळ्यांच्या वरील बाजूस (supraorbital) डोके दुखणे
२ ई. काळजी आणि अस्वस्थता यांमुळे चेहरा फिकट पडणे
२ उ. मरणाची भीती वाटणे
३. नक्स व्हॉमिका (Nux Vomica)
३ अ. सडपातळ अंगकाठी, बद्धकोष्ठता, बैठी जीवनशैली असणार्या व्यक्तींना डोकेदुखी होणे
३ आ. अतीखाण्यामुळे पोट बिघडणे, तंबाखू किंवा मद्य यांचे सेवन, मानसिक अतीश्रमामुळे डोकेदुखी होणे
४. नेट्रम् म्युरियाटिकम् (Natrum Muriaticum)
४ अ. शाळकरी मुलींचे सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंत डोके दुखणे
४ आ. रक्तक्षय (anaemia) असणार्या व्यक्तीचे डोके दुखणे
४ इ. डोक्यात जणू सहस्रो छोट्या हातोड्यांनी घाव घातले जात असल्याप्रमाणे होणारी, ठुसठुसल्याप्रमाणे डोकेदुखी
४ ई. सतत अभ्यास किंवा शिवणकाम केल्याने डोळ्यांवर ताण पडून डोके दुखणे
४ उ. डोळ्यांपुढे अंधारी येऊन नागमोडी आकारात वीज चमकल्यासारखे वाटणे (blindness with zig-zag dazzling like lightening) आणि त्यानंतर डोकेदुखी चालू होणे
५. जल्सेमियम सेम्पर्विरेन्स (Gelsemium Sempervirens)
५ अ. डोक्याच्या, विशेषतः वरील भागामध्ये मंद आणि भारी (dull and heavy) वेदना होणे, तर कानशिलात ठुसठुसल्याप्रमाणे (throbbing) वेदना होणे
५ आ. डोळ्यांच्या पापण्या जड होऊन खाली झुकणे, डोळे जड होणे, तसेच चक्कर येणे
५ इ. डोकेदुखी चालू होण्यापूर्वी दिसेनासे होणे आणि डोकेदुखी चालू झाल्यानंतर दृष्टी पूर्ववत् होणे
५ ई. मानसिक त्रास, तंबाखू खाणे, वाकणे आणि उन्हामध्ये फिरणे यांमुळे डोकेदुखी वाढणे
५ उ. लघवी केल्यानंतर डोकेदुखी न्यून होणे
६. ग्लोनाइन (Glonine)
६ अ. उन्हामध्ये गेल्याने होणारी डोकेदुखी
६ आ. डोक्याला ऊन लागल्यामुळे डोक्याशी संबंधित विविध त्रास, उदा. डोकेदुखी, गरगरणे, चक्कर येणे इत्यादी चालू होणे
६ इ. डोक्यामध्ये ठुसठुसणार्या वेदना होणे
६ ई. उन्हामध्ये गेल्यानंतर उष्णता सहन न होणे
६ उ. डोक्यावर टोपी सहन न होणे
६ ऊ. डोक्याचा आकार मोठा झाला असल्याचे जाणवणे
६ ए. गर्भाशयातून रक्तस्राव झाल्यानंतर होणारी डोकेदुखी
७. सॅन्ग्विनेरिया कॅनाडेन्सिस (Sanguinaria Canadensis)
७ अ. शारिरीक, तसेच मानसिक श्रमामुळे उजव्या बाजूचे डोके तीव्रतेने दुखणे
७ आ. पडून राहिल्याने आणि झोपल्याने बरे वाटणे
७ इ. रजोनिवृत्तीच्या वेळी डोके दुखणे, सोबत पित्ताच्या उलट्या होणे
७ ई. मासिक पाळीच्या वेळी वीज चमकल्याप्रमाणे डोक्यामध्ये वेदना होणे, तसेच पुष्कळ प्रमाणात रजोस्राव होणे (अंगावर जाणे)
८. स्पायजेलिया ॲन्थेलमिया (Spigelia Anthelmia)
८ अ. पावसाळी, दमट, थंड हवामानामुळे होणारी डोकेदुखी
८ आ. मज्जातंतूर्गत वेदना (neuralgia), वेदना मानेच्या मुळाशी चालू होऊन त्या विशेषतः मानेच्या डाव्या भागात स्थिर होणे
८ इ. डोकेदुखी ठराविक कालावधीनंतर (periodical) आणि सकाळपासून रात्रीपर्यंत असणे
८ ई. थोडी जरी हालचाल केली, तरी वेदनांमध्ये वाढ होणे, त्यासमवेत अस्वस्थता आणि धडधड असणे
९. कॅमोमिल्ला (Chamomilla)
९ अ. क्रोध आल्यानंतर डोके दुखणे, डोक्यात असह्य अशा आवळल्यासारख्या, ओढल्यासारख्या वेदना होणे
९ आ. डोकेदुखीकडे लक्ष दिल्यावर, तसेच भोजनानंतर डोकेदुखी वाढणे
१०. ब्रायोनिया अल्बा (Bryonia Alba)
१० अ. आवळल्याप्रमाणे (pressive), डोके जणू फुटेल, तुटेल (bursting, splitting), असे डोके दुखणे
१० आ. हालचाल केल्याने डोकेदुखी वाढणे; शांतपणे पडून राहिल्याने, डोके दाबल्याने आणि अंधारामध्ये डोकेदुखी न्यून होणे
१० इ. उजव्या बाजूचे डोके दुखणे आणि त्यासह मळमळ अन् पित्ताच्या उलट्या होणे
१० ई. तहान लागून प्रत्येक वेळेस पुष्कळ पाणी पिणे
११. पल्सेटिला निगरिकन्स (Pulsatilla Nigricans)
११ अ. अतिश्रमानंतर डोके दुखणे, वेदनेची जागा डोक्याच्या विविध भागांत सतत पालटत असणे
११ आ. डोकेदुखीबरोबर डोळ्यांतून जळजळणारे पाणी वहाणे
११ इ. रुग्णाला मोकळ्या हवेमध्ये बरे वाटणे
१२. सल्फर (Sulphur)
१२ अ. डोके वरील किंवा मागील भागात ठुसठुसल्याप्रमाणे (throbbing) किंवा आवळल्याप्रमाणे दुखणे
१२ आ. डोक्याच्या टाळूवर जळजळ होणे. ती रात्री अंथरुणात असतांना वाढणे
१२ इ. सकाळी उठल्यावर, डोके दाबल्यावर डोकेदुखी कमी होणे
१२ ई. रक्ताचा प्रवाह डोक्यात जोरात जात असल्याप्रमाणे वाटणे
१२ उ. प्रत्येक सप्ताहात एकदा डोके दुखणे
१३. इग्नेेशिया अमारा (Ignatia Amara)
१३ अ. ठराविक ठिकाणी आवळल्याप्रमाणे डोके दुखणे
१३ आ. कपाळाच्या मध्यभागी, तसेच नाकाच्या मुळाशी, म्हणजे नाकाचा कपाळाला टेकलेला भाग येथे दाब जाणवणे
१३ इ. चिंता, काळजी किंवा शोक यांमुळे उद़्भवणारी डोकेदुखी
१४. लॅचेसिस म्युटस (Lachesis Mutus)
१४ अ. स्त्रियांंमध्ये रजोनिवृत्तीच्या (menopause) नंतर होणारी डोकेदुखी, ज्यात टाळूवर आग होते
१४ आ. डाव्या बाजूचे डोके पुष्कळ दुखणे, त्या वेळी चेहरा फिकट पडणे
१४ इ. झोपून उठल्यानंतर डोकेदुखी वाढणे
१५. सिलिशिया (Silicea)
१५ अ. डोकेदुखीचा जुनाट आजार असणे, त्यासह ‘दाब, गोंधळ, हालचाल आणि प्रकाश’ सहन न होणे
१५ आ. डोक्याभोवती शाल गुंडाळल्याने, दाब दिल्याने, डोकेदुखी तात्पुरती न्यून होणे
१५ इ. अतीश्रमानंतर डोकेदुखी चालू होणे, यात वेदना मानेच्या खालच्या भागामध्ये चालू होऊन त्या उजव्या डोळ्यामध्ये स्थिर होणे, ‘मान गळून पडेल’, असे वाटणे
१६. कल्केरिया फॉस्फोरिकम् (Calcarea Phosphoricum)
१६ अ. शाळकरी मुलींना जुलाबासह होणारी डोकेदुखी
१६ आ. हवामानातील पालटांमुळे होणारी डोकेदुखी
१६ इ. डोकेदुखी असतांना तंबाखूच्या धुराचा वास घेण्याची तीव्र इच्छा होणे, वास घेतल्यावर डोकेदुखी न्यून होणे
१६ ई. डोके दुखत असतांना चेहरा आणि डोके गरम होणे, सुस्ती येणे, मन अप्रसन्न असणे
१७. चायना ऑफिसिनॅलिस (China Officinalis)
१७ अ. डोक्यामध्ये धडकल्यासारख्या, फाडल्यासारख्या वेदना (jerking, tearing pains) होणे
१७ आ. मेंदू लाटांमध्ये कवटीवर धडकत असल्यासारखे जाणवणे
१७ इ. डोके केवळ एकाच बाजूला दुखणे
१७ ई. कानामध्ये आवाज येणे
१७ उ. डोकेदुखीमुळे झोप न लागणे
१७ ऊ. रात्री जागरण करणे आणि चालणे यांमुळे डोकेदुखी वाढणे
१७ ए. शांतपणे पडून राहिले असता डोकेदुखी न्यून होणे
१८. अँटिमोनियम क्रूडम् (Antimonium Crudum)
लोणचे, आम्लयुक्त पदार्थ खाणे, नदीमध्ये स्नान करणे यांमुळेे होणारी डोकेदुखी
१९. सेपिया ऑफिसिनॅलिस (Sepia Officinalis)
१९ अ. प्रतिदिन सकाळी होणार्या डोकेदुखीमुळे डोळे उघडणे कठीण होणे
१९ आ. डोकेदुखी असतांना संभोगाची तीव्र इच्छा होणे
१९ इ. डोकेदुखीचे तीव्र झटके येणे
२०. कॅनॅबिस इंडिका (Cannabis Indica)
२० अ. डोकेदुखी असतांना ‘जणू डोक्याची टाळू (डोक्याच्या वरचा मधला भाग) उघडत आहे आणि बंद होत आहे’, असे वाटणे
२० आ. डोकेदुखी असतांना जणू कवटी (डोक्याच्या वरचा मधला हाडाचा भाग) वर खेचली जात आहे, असे वाटणे
२० इ. डोकेदुखीसह पोटात वायू जमा होणे
२० ई. डोक्याची आपोआप हालचाल होणे
२० उ. मूत्रपिंडाच्या आजारामुळे डोकेदुखी होणे
२० ऊ. असामान्य खळबळ (excitement) आणि बडबड यांसह अर्धशिशी होणे
२१. कॅक्टस ग्रँडिफ्लोरस् (Cactus Grandiflorus)
२१ अ. डोक्याची वरची बाजू जणू आवळल्याप्रमाणेे, सर्व बाजूंनी पट्ट्याने आवळल्याप्रमाणे किंवा डोक्यावर मोठे ओझे ठेवल्याप्रमाणे दुखणे, असे दुखणे विशेषतः मासिक पाळीच्या तक्रारींसह किंवा रजोनिवृत्तीच्या (menopause च्या) वेळी दुखणे
२१ आ. डोके सकाळी ११ ते रात्री ११ या कालावधीत दुखणे
२२. आर्सेनिकम् आल्बम् (Arsenicum Album)
२२ अ. डोळ्यांच्या वरील भागात डोके दुखणे आणि टाळूवर आग होणे
२२आ. ठराविक कालावधीनंतर डोकेदुखी उद़्भवणे आणि त्यासह अशक्तपणा जाणवणे किंवा अशक्तपणामुळे डोकेदुखी उद़्भवणे
२२ इ. ऊबेच्या संपर्कात येणे, डोके उंच करून झोपणे यांनंतर बरे वाटणे
२२ ई. प्रत्येक वेळी थोडे-थोडे; परंतु वारंवार पाणी पिणे
२३. लायकोपोडियम क्लॅव्हॅटम् (Lycopodium Clavatum)
२३ अ. डोकेदुखी असतांना टाळूवर, कानशिलावर (temple) (बहुतेक वेळा उजव्या), डोळ्यांच्या वर, नाकाच्या मुळाशी वेदना होणे
२३ आ. सायंकाळी ४ ते ८ या वेळेत डोकेदुखी सर्वाधिक असणे
२४. फॉस्फोरम् अॅसिडम् (Phosphorum Acidum)
संभोग, तसेच डोळ्यांचा अतीवापर यांमुळे डोके दुखणे
२५. कॅलियम बायक्रोमिकम् (Kalium Bichromicum)
२५ अ. औषध घेऊन सर्दी तात्पुरती दाबल्यामुळे छोट्या छोट्या भागांमध्ये डोके दुखणे
२५ आ. एका डोळ्याच्या वर, विशेषतः उजव्या डोळ्याच्या वर डोके दुखणे
२५ इ. डोकेदुखी चालू होण्यापूर्वी दृष्टी अस्पष्ट (blurred) होणे आणि वेदना चालू झाल्यानंतर दृष्टी सुधारणे
२६. कॅप्सिकम् (Capsicum)
२६ अ. खोकतांना डोकेदुखी चालू होऊन ‘कवटी फुटेल की काय ?’, असे वाटणे
२६ आ. संपूर्ण डोके दुखणे
२७. इपिकॅकुआन्हा (Ipecacuanha) : डोकेदुखी बरोबर मळमळ असणे
२८. सेड्रॉन (Cedron) : प्रतिदिन एकाच वेळी डोके दुखणे
२९. सेलेनियम मेटॅलिकम् (Selenium Metalicum) : चहा सेवन केल्यामुळे होणारी डोकेदुखी
३०. अँब्रा ग्रिसीया (Ambra Grisea) : वृद्धापकाळात होणारी डोकेदुखी आणि त्यासह उदासीन वाटणे
३१. बरायटा म्युरियाटिकम् (Baryta Muriaticum) : उच्च रक्तदाबामुळे होणारी डोकेदुखी
३२. अॅगारिकस मस्केरियस (Agaricus Muscarius) : डोकेदुखी आणि त्यासह नाकातून रक्तस्राव होणे.