अबू धाबी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’च्या उद्घाटन कार्यक्रमात सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सहभागी !

अबू धाबीतील ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’ने आयोजित केला होता कार्यक्रम !

वाळवंटात बांधण्यात आलेले आणि पश्‍चिम आशियातील सर्वांत मोठे ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिर’ !

अबू धाबी – येथील वाळवंटात बांधण्यात आलेले आणि पश्‍चिम आशियातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असलेल्या ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’चे उद्घाटन १४ फेब्रुवारी या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झाले.

यानिमित्ताने मंदिराच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘हार्मनी’ या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. हे मंदिर सर्वांना दर्शनासाठी १ मार्च २०२४ पासून उघडण्यात येणार आहे.

‘बी.ए.पी.एस्. मंदिरा’कडून उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याविषयी अधिकृत निमंत्रण

मंदिराचे पदाधिकारी श्री. रवींद्र कदम यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये मंदिराच्या वतीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण पाठवले होते.

श्रीराम आणि सीता मंदिराचे दर्शन घेतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
शंकर पार्वती मंदिराचे दर्शन घेतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
‘बी.ए.पी.एस्. मंदिरा’तील राधाकृष्ण मंदिर
‘बी.ए.पी.एस्. मंदिरा’तील जगन्नाथाचे मंदिर

सनातन संस्थेच्या ३ गुरूंच्या नावे मंदिराच्या बांधकामासाठी ३ विटा अर्पण !

मंदिराच्या बांधकामासाठी सनातन संस्थेच्या ३ गुरूंच्या नावाने देण्यात आलेल्या विटांचे पूजन करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

जुलै २०२२ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या संशोधनाच्या निमित्ताने संयुक्त अरब अमिरातच्या दौर्‍यावर होत्या. २७ जुलै २०२२ या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’ला भेट देऊन त्याच्या बांधकामाची पहाणी केली होती. त्या वेळी त्यांनी सनातन संस्थेच्या ३ गुरूंच्या नावाने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नावे) मंदिराच्या बांधकामासाठी ३ विटा पूजन करून अर्पण केल्या. ‘बी.ए.पी.एस्. मंदिरा’चे पदाधिकारी श्री. रवींद्र कदम यांनी विटांच्या पूजनाची सिद्धता केली होती आणि त्यांनी मंदिराची माहिती अन् वैशिष्ट्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितली होती.

‘बी.ए.पी.एस्. मंदिरा’त उपस्थित श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘बी.ए.पी.एस्. मंदिरा’ची काही मनाेहारी दृश्ये !

‘बी.ए.पी.एस्. मंदिरा’तील प.पू. प्रमुख स्वामी महाराजांची मूर्ती

मंदिराची वैशिष्ट्ये

‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिर हे संयुक्त अरब अमिरातमधील पहिले हिंदु मंदिर असून एकूण २७ एकर भूमीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या भिंतींवर रामायण, शिव पुराण आणि भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेची चित्रे काढण्यात आली आहेत. याखेरीज मंदिराजवळ एक गंगा घाट बनवण्यात आला आहे. गंगा- यमुना आणि सरस्वतीचा संगमही या मंदिरामध्ये दाखवण्यात आला आहे. यासमवेत या मंदिरात श्री अक्षर पुरुषोत्तम भगवान, श्री राधा-कृष्ण भगवान, प्रभु श्रीराम-सीता, श्री शिव-पार्वती, भगवान जगन्नाथ, भगवान श्रीनिवास-पद्मावतीदेवी आणि भगवान अय्यप्पा स्वामी यांचीही ही मंदिरे आहेत.

मंदिरात स्थापन केलेल्या परब्रह्म पुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायण आणि अक्षरब्रह्म श्री गुणातीतानंद स्वामी यांच्या मूर्ती
भगवान श्री स्वामीनारायण यांच्या मूर्तीला जलाभिषेक करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘बी.ए.पी.एस्. मंदिरा’तील दि‍व्य प्रसंगांचे सुंदर नक्षीकाम केलेली काही छायाचित्रे !

मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात वंदनीय उपस्थिती

मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने १५ फेब्रुवारी या दिवशी मंदिराकडून ‘हार्मनी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिराचे प्रमुख महंत स्वामी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात हिंदु धर्मासह मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, ज्यू आणि शीख या विविध पंथांचे गुरु अन् त्यांचे शिष्य उपस्थित होते. या वेळी व्हॅटिकन सिटी येथील चर्चचे विशेष प्रतिनिधी, तसेच इस्रायलच्या ज्यू धर्माचे विशेष प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाला हरिद्वार येथील आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपतींच्या स्वीय सल्लागारांनी केले. स्वामी ब्रह्मविहारीदास महाराज यांनी स्वागतपर भाषण केले.

या कार्यक्रमाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ याही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या आधी सर्व विशेष निमंत्रितांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना मंदिराच्या सेवाधारी सौ. शीतल टांक यांनी मंदिर दर्शन घडवले अन् मंदिराविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी मंदिराचे पदाधिकारी श्री. रवींद्र कदम उपस्थित होते. या वेळी मंदिराच्या वतीने चित्रीकरण करणारे साधक श्री. स्नेहल राऊत आणि श्री. विनायक शानभाग यांना विशेष पास देण्यात सहकार्य करण्यात आले.

 

Leave a Comment