‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.
संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे
घटनापूर्व चिंता, म्हणजे भविष्याबद्दल चिंता करणे, काहीतरी वाईट घडणार किंवा जे कार्य हाती घेतले आहे ते यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेता येणार नाही, याची चिंता वाटणे. कोणताही अवघड निर्णय, कृती किंवा परिस्थिती यांचा प्रत्यक्ष सामना करावा लागण्याआधीच, केवळ विचाराने वाटणारी चिंता म्हणजे घटनापूर्व चिंता.
१. जल्सेमियम सेम्पर्विरेन्स (Gelsemium Sempervirens)
१ अ. कोणत्याही नेहमीपेक्षा वेगळ्या परिस्थितीला सामोरे जाणे, कोणत्याही समारंभात जाणे किंवा कुणाला भेटणे, व्यासपिठावरून बोलणे, परिक्षेला सामोरे जाणे, गर्दीमध्ये जाणे यांविषयीच्या विचारानेच चिंता वाटून जुलाब होणे.
१ आ. एकांतामध्ये शांतपणे रहावे, कुणाशीही बोलू नये, असे वाटणे.
२. अर्जेंटम् नायट्रिकम् (Argentum Nitricum)
२ अ. महत्त्वाच्या प्रसंगी, तसेच व्यासपिठावरून बोलणे यांबद्दल चिंता आणि धास्ती वाटणे अन् जुलाब होणे
२ आ. वेळ संथ गतीने जात आहे, असे वाटणे; प्रत्येक गोष्ट घाईने करायची असणे – गतीने चालणे, कायम घाईत असणे
३. बाराक्षार औषध
३ अ. कॅलियम फॉस्फोरिकम् (Kalium Phosphoricum) : हे औषध ‘६ x’ या ‘पोटन्सी’ मध्ये मेंदूला बलवर्धक म्हणूनघ्यावे.