‘हिंदूंनो, अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर श्रीरामाच्या कृपेमुळे आपल्या पिढीला श्रीराम त्याच्या जन्मभूमीत विराजमान झालेला बघायला मिळत आहे. इतक्यावर आनंद मानणे योग्य रहाणार नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. यासाठी आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत; म्हणून आजपासून स्वतःच्या साधनेच्या जोडीला प्रतिदिन शक्य तितका वेळ किंवा न्यूनतम (कमीतकमी) २ घंटे आपल्या उपास्यदेवतेचा किंवा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप करावा. कुणाला बसून नामजप करणे शक्य नसल्यास त्यांनी येता-जाता अथवा प्रवासातही हा नामजप करावा.
सनातनच्या साधकांनी ते ‘स्वतःची साधना’ म्हणून जे जप करत आहेत (उदा. आध्यात्मिक उपायांसाठीचा किंवा ‘निर्विचार’ हा जप), तेच त्यांनी चालू ठेवावेत. ते हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी समष्टी साधना करतच आहेत.
हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यानंतर ‘त्याचे रामराज्यात रूपांतर व्हावे’, यासाठी तेव्हा मात्र साधकांसह सर्वांनीच त्या वेळी किमान २ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप करावा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले