१. महंत श्री. दीपक वल्लभ गोस्वामी (संस्थापक आणि अध्यक्ष, ज्ञानम् फाऊंडेशन), जयपूर
अ. ‘आश्रमात आल्यावर ‘माझ्या संपूर्ण शरिरात एका ऊर्जेचा संचार होत आहे’, असे मला जाणवले.
आ. आश्रमात मला आनंदाची अनुभूती आली.
इ. आश्रमात ज्ञानार्जन केले जाते. ‘आम्हाला अजून पुष्कळ काही शिकायचे आहे’, याची मला जाणीव झाली.
ई. अशा प्रकारचा आश्रम प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना याचा लाभ होऊ शकेल. जय श्रीकृष्ण !’
२. श्री. पंकज शर्मा (जिल्हाध्यक्ष, संयुक्त भारतीय धर्मसंसद), जयपूर
अ. ‘आश्रम हे पवित्र, अद्भुत आणि अलौकिक स्थान असून ते आयुष्यभर माझ्या लक्षात राहील.
३. श्री. विनोद प्रजापती (संस्थापक, संस्कार सेवा योजना), फुलेरा, जयपूर
अ. ‘आश्रमात सेवा करणारे सर्व साधक सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागतात. सर्वांमध्ये समर्पणभाव आहे.’
४. श्री. रामराय शर्मा (संघटन प्रभारी, गायत्री परिवार), जयपूर
अ. ‘सनातनचा आश्रम ही तपोभूमी आहे. हे एक दिव्य साधना केंद्र आहे. ‘साक्षात् भगवान श्रीकृष्ण येथे लीला करत आहे’, असे मला सूक्ष्मातून जाणवले.’
५. श्री. राचोतय्या हिरेमठ (श्री गुरुसंस्थान हिरेमठ), विजयपूर
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला.
आ. सनातन संस्था ही सनातन धर्माचे संरक्षण करण्यासाठी कटीबद्ध असणारी, पुढच्या पिढीला हिंदु धर्माचे चिंतन, आचार आणि विचार समजावून सांगणारी संस्था आहे.’
६. पू. श्री. ष.ब्र प्र. अभिनव रुद्रमनी शिवाचार्य महास्वामीजी, विजयपूर
अ. ‘साधकांचे सौजन्यपूर्ण वागणे आणि सरळता पाहून माझ्या मनाला आनंद झाला.’
७. श्री. ईरप्पा हंनश्लाळ, महालिंगपूर
अ. ‘आश्रमातील कार्यपद्धती, येथील वातावरण, दैवी शक्ती आणि साधनेची शक्ती पाहून आम्हाला पुष्कळ आनंद झाला.’
८. श्री. नवीन कुलाल, दक्षिण कन्नड
अ. ‘साधकांची अलौकिक साधना आणि त्यांनी केलेले वैज्ञानिक विश्लेषण यांमुळे माझे डोळे उघडले.
आ. आध्यात्मिक अनुष्ठानाचा मला प्रत्यक्ष अनुभव आला.’
९. श्री. संजीवकुमार सज्जन, जिल्हा बीदर
अ. ‘सर्व हिंदु बंधू-भगिनींनी मोक्षाचा मार्ग कसा आहे ?’, हे शिकण्यासारखे आहे. सनातन धर्मच मोक्षाचा मार्ग दाखवतो. आश्रमात सनातन धर्माची शिकवण दिली जाते. आश्रमाचे कार्य उत्तम आहे.’