जळगाव – ऋषिमुनींनी केलेले संशोधन आणि आरोग्याविषयीचे ज्ञान समाजाला कळावे, यासाठी येथे सनातन संस्थेच्या वतीने डॉ. दीपक जोशी यांनी बिंदूदाबन उपचार शिबिर घेतले. आगामी आपत्काळाचा सामना समाजाला करावा लागेल. अशा काळात आपले स्वतःचे आणि आपल्या परिवाराचे रक्षण करण्याचे मोठे आवाहन आपल्या समोर असेल. या काळात दळणवळण साधनांची कमतरता, रुग्णालयापर्यंत पोचण्यातील अडथळे, वैद्यांशी होणारा संपर्क आणि औषधालयात औषधे मिळणे कठीण होईल. हे आवाहन पेलता यावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने येथे १२ ते १४ जानेवारी या कालावधीत बिंदूदाबन उपचार शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. यात हात-पायांच्या तळव्यांमध्ये स्थित असलेल्या बिंदूंना दाबून आजारांचे निदान आणि उपचार केले जातात. या शिबिराचा जिल्ह्यातील पुष्कळ स्त्री-पुरुष साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
सनातन संस्थेच्या वतीने जळगाव येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्था आयोजित बालक-पालक मेळावा पार पडला !
- सनातन संस्था आयोजित बालसंस्कार वर्गामुळे मुलांमध्ये सकारात्मक परिवर्तन ! – पालकांचे मनोगत
- महाकुंभक्षेत्री आग लागलेल्या घटनास्थळी सनातन संस्थेच्या साधकांचे प्रशासनास साहाय्य !
- सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिराचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन !
- अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !
- सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !