सर्दी, खोकला आणि होमिओपॅथी औषधे

Article also available in :

‘घरच्‍या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, अम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धत घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती यात देत आहोत.

‘प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी ‘होमिओपॅथी स्‍वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्‍यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून घ्‍यावी’, ही विनंती !

संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे आणि डॉ. अजित भरमगुडे

सर्दी (Common cold)

सर्दी हा नाक आणि घसा यांचा सर्वसामान्‍य आजार आहे. सर्दी या आजारात नाक वहाणे, शिंका येणे, नाक चोंदणे, डोळ्‍यांतून पाणी वहाणे, घसा खवखवणे आणि क्‍वचित ताप येणे, ही लक्षणे सामान्‍यतः आढळतात. या लक्षणांच्‍या व्‍यतिरिक्‍त कोणती वैशिष्‍ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्‍यावे, हे औषधांच्‍या नावापुढे दिले आहे.

१. सर्दी होऊ नये, यासाठी घ्‍यावयाची काळजी

१ अ. सर्दी झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या हातांना स्‍पर्श करणे, त्‍यांनी हाताळलेल्‍या वस्‍तूंचा वापर करणे टाळावे, इतरांच्‍या उष्‍ट्या पेल्‍याने आपण काही ग्रहण करू नये.

१ आ. हात स्‍वच्‍छ धुवावे, हात धुतल्‍यावाचून डोळे, नाक, तोंड यांना स्‍पर्श करू नये.

१ इ. तोंड आणि नाक यांवर रूमाल धरावा.

२. औषधे

२ अ. एलियम सेपा (Allium Cepa)

२ अ १. नाकातून पुष्‍कळ प्रमाणात जळजळणारा स्राव वहाणे, त्‍यामुळे नाक, तसेच वरच्‍या ओठाची त्‍वचा सोलपटणे

२ अ २. सतत शिंका येणे

२ अ ३. डोळ्‍यांंतून सामान्‍य (न जळजळणारे) पाणी वहाणे

२ आ. युफ्रेशिया ऑफिसिनॅलिस (Euphrasia Officinalis)

२ आ १. नाकातून सामान्‍य (न जळजळणारे) पाणी, तसेच शेंबूड गतीने वहाणे

२ आ २. डोळ्‍यांतून जळजळणारे पाणी वहाणे

२ इ. अ‍ॅकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)

२ इ १. कोरड्या, थंड हवेमध्‍ये गेल्‍याने किंवा घाम येत असतांना थंड वारे लागल्‍यानंतर सर्दी होणे

२ इ २. सतत शिंका येणे आणि नाकातून पारदर्शक, गरम पाणी वहाणे

२ इ ३. एकंदरीत मोकळ्‍या हवेमध्‍येे चांगले वाटणे

२ इ ४. दुर्गंध सहन न होणे

२ ई. नक्‍स व्‍हॉमिका (Nux Vomica)

२ ई १. थंड आणि दमट हवेमध्‍ये गेल्‍याने सर्दी होणे

२ ई २. नाक सर्दीने गच्‍च होणे; परंतु सर्दी अल्‍प प्रमाणात बाहेर पडणे, छातीच्‍या ठिकाणी गच्‍चपणा जाणवणे

२ ई ३. रात्री आणि मोकळ्‍या हवेमध्‍ये नाक बंद होणे, दिवसा आणि उबदार खोलीमध्‍ये नाक वहाणे

२ ई ४. तीव्र वास सहन न होणे

२ ई ५. अतिशय थंडी वाजणे, तसेच जीभ स्‍वच्‍छ असणे (जिभेवर थर नसणे)

२ उ. आर्सेनिकम् आल्‍बम् (Arsenicum Album)

२ उ १. हिवाळ्‍यामध्‍ये आणि मोकळ्‍या हवेमध्‍ये गेल्‍याने सर्दी होणे

२ उ २. शिंका येणे, नाकातून पाण्‍यासारखे पातळ, जळजळणारे, सोलपटणारे पाणी आणि शेंबूड वहाणे

२ उ ३. नाकपुड्या पुष्‍कळ कोरड्या पडून त्‍या ठिकाणी आग होणे

२ उ ४. अतिशय थकवा जाणवणे

२ उ ५. सातत्‍याने थोडे थोडे सामान्‍य तापमान असलेले पाणी पिणे

२ ऊ. मर्क्‍युरियस सॉल्‍युबिलिस (Mercurius Solubilis)

२ ऊ १. नाकातून घट्ट, दुर्गंधयुक्‍त, जळजळणारा हिरवा स्राव वहाणेे

२ ऊ २. नाकात पुष्‍कळ दुर्गंधयुक्‍त शेंबूड असणे

२ ऊ ३. नाकामध्‍ये खपल्‍या धरणे, त्‍या काढल्‍या असता रक्‍त येणे

२ ए. हेपार सल्‍फुरिस (Hepar Sulphuris)

२ ए १. नाक वहाणे आणि त्‍यासह नाकाला आतून सूज येऊन वेदना होणे

२ ए २. कोणत्‍याही एका बाजूने नाक वहाणे, त्‍यासह घसा खवखवणे आणि ताप येणे

२ ए ३. पुष्‍कळ थंडी वाजणे, थंडीमुळे अंगावरचे कपडे काढायला नकोसे वाटणे

२ ए ४. घशामध्‍ये काटा खूपतो आहे, असे वाटणे

२ ऐ. पल्‍सेटिला निग्रिकन्‍स (Pulsatilla Nigricans)

२ ऐ १. उबदार खोलीमध्‍ये श्‍वासोच्‍छ्‍वास करणे त्रासदायक होणेे; परंतु मोकळ्‍या हवेमध्‍ये एकदम चांगले वाटणे

२ ऐ २. घट्ट, पिवळसर-हिरवट स्राव नाकातून वहाणे

२ ऐ ३. सर्दी असतांना तोंडाला चव नसणे

२ ओ. जल्‍सेमियम सेम्‍पर्विरेन्‍स (Gelsemium Sempervirens)

२ ओ १. थंड हवेमध्‍ये गेल्‍याने सर्दी होणे, ताप येणे, तहान नसणे

२ ओ २. नाकातून जळजळणारा स्राव वहाणे, डोके जड होणे

२ ओ ३. नाकपुड्या हुळहुळ्‍या होऊन त्‍यांना सूज येणे

२ ओ ४. सकाळी पुन्‍हा पुन्‍हा शिंका येणे

२ ओ ५. अतिशय थकवा येऊन झोपून रहावेसे वाटणे

२ औ. सॅन्‍ग्‍विनेरिया कॅनाडेन्‍सिस (Sanguinaria Canadensis)

२ औ १. नाक वहाणे, सतत शिंका येणे, उजव्‍या बाजूला अधिक त्रास होणे

२ औ २. नाकामध्‍ये झिणझिण्‍या येऊन पाण्‍यासारखा, जळजळणारा स्राव वहाणे

२ औ ३. फुलांचा गंध सहन न होणे, गंधामुळे चक्‍कर येणे

२ औ ४. नाकामध्‍ये मांस (Polyp) वाढणे

२ अं. सल्‍फर (Sulphur)

२ अं १. नाकाच्‍या मुळाशी ठुसठुसणे

२ अं २. नाकामध्‍ये जळजळ होणे

२ अं ३. नाकाचा शेंडा लाल आणि चमकदार होणे

२ अं ४. सर्दी झाल्‍यानंतर वास न येणे

खोकला (Cough)

‘खोकला’, ही घसा किंवा श्‍वासनलिका यांत अडकलेला घटक जोराने बाहेर फेकून श्‍वासनलिका मोकळी करण्‍यासाठी असलेली एक नैसर्गिक प्रतिक्षिप्‍त क्रिया (reflex action) आहे. खोकला कोरडा किंवा कफ असलेला असू शकतो.

१. खोकल्‍याच्‍या संदर्भात घ्‍यायची सर्वसाधारण काळजी

डॉ. प्रवीण मेहता

१ अ. खोकला येत असतांना पाणी भरपूर प्‍यावे, कडकडीत पाण्‍याने अंघोळ करावी, नाकाने वाफ घ्‍यावी.

१ आ. ज्‍यामुळे खोकल्‍याची उबळ येऊ शकते, उदा. धूळ, धूर, इत्‍यादींपासून दूर रहावे.

१ इ. खोकला असलेल्‍या व्‍यक्‍तींपासून दूर रहावे किंवा त्‍यांच्‍या खोकल्‍यातून बाहेर पडणार्‍या जिवाणूंचा संसर्ग आपल्‍याला होऊ नये यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घ्‍यावी. धूम्रपान करणारे, तीव्र गंध, धूळ, पाळीव प्राणी यांपासून दूर रहावे.

१ ई. खोकला येत असतांना श्‍वास घ्‍यायला अडचण येत असेल किंवा खोकल्‍यानंतर पडणार्‍या बडग्‍यातून रक्‍त पडत असेल, तर त्‍याकडे दुर्लक्ष न करता त्‍वरित तज्ञांचा सल्ला घ्‍यावा.

खोकला या लक्षणाच्‍या व्‍यतिरिक्‍त कोणती वैशिष्‍ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्‍यावे, हे औषधांच्‍या नावापुढेदिले आहे.

२. होमिओपॅथी औषधे

डॉ. अजित भरमगुडे

२ अ. अ‍ॅकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)

२ अ १. कोरड्या थंडगार हवेमध्‍ये जाणे किंवा गार वारे लागणे, यानंतर खोकला येणे

२ अ २. कोरडा आणि मोठ्याने आवाज करणारा खोकला

२ अ ३. श्‍वास बाहेर सोडतांना खोकला येणे

२ आ. बेलाडोना (Belladona)

२ आ १. केस कापणेे किंवा भिजणे यानंतर खोकला येणे

२ आ २. त्रासदायक, मोठ्याने आवाज करत येणारा खोकला; सायंकाळी, तसेच रात्रीच्‍या आरंभी खोकला वाढणे

२ आ ३. चेहरा गरम अणि लाल होणे

२ इ. ब्रायोनिया अल्‍बा (Bryonia Alba)

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

२ इ १. सकाळी हालचाल केली किंवा चालले की, खोकला येणे आणि उबदार खोलीमध्‍ये गेल्‍यावर तो वाढणे

२ इ २. आरंभी खोकल्‍यासह अत्‍यल्‍प कफ पडणेे आणि नंतर कोरडा खोकला येणे

२ इ ३. खोकल्‍याची उबळ आल्‍यावर छाती हाताने घट्ट धरून ठेवणे

२ इ ४. तहान पुष्‍कळ लागणे; परंतु पुष्‍कळ अंतराने पुष्‍कळ पाणी ग्रहण करणे

२ ई. ड्रॉसेरा रोटंडिफोलिया (Drosera Rotundifolia)

२ ई १. रात्री उशीवर डोके टेकताच, कुत्रा भुंकतांना जसा मोठा आवाज येतो, त्‍याप्रमाणे खोलवर आवाज करणारा खोकला येणे

२ ई २. कंठामध्‍ये पिसाने गुदगुल्‍या केल्‍याप्रमाणे संवेदना होऊन खोकला येणे

२ ई ३. खोकल्‍याची उबळ वरच्‍या वर येणे, त्‍यामुळे श्‍वास घ्‍यायला आणि सोडायला त्रास होणे

२ ई ४. डांग्‍या खोकला होणे (डांग्‍या खोकला हा श्‍वसनसंस्‍थेला होणारा एक तीव्र सांसर्गिक आजार आहे. या आजाराचा आरंभ नाक गळणे, शिंका येणे अशा लक्षणांनी होतो. पुढे न थांबवता येणारा आणि तीव्र खोकला येतो अन् रुग्‍णाला श्‍वास घेण्‍यास अडथळा निर्माण होतो. या रोगाचे मुख्‍य लक्षण, म्‍हणजे जेव्‍हा रुग्‍ण श्‍वास घेण्‍याचा प्रयत्न करतो, तेव्‍हा घशात ‘हूप’ असा विशिष्‍ट आवाज येतो. कोणत्‍याही वयाच्‍या व्‍यक्‍तीला हा रोग होऊ शकतो.  खोकला एकदा चालू झाला की, त्‍याची उबळ १० ते १५ मिनिटांपर्यंत टिकून रहाते. खोकल्‍यानंतर उलटी होणे, हेही एक महत्त्वाचे लक्षण आहे.)

२ उ. कॉक्‍कस कॅक्‍टाय (Coccus Cacti)

२ उ १. ठराविक वेळी घशामध्‍ये खवखवल्‍याप्रमाणे होऊन खोकल्‍याची उबळ येणे आणि शेवटी उलटी होऊन त्‍यामधून पुष्‍कळ प्रमाणात चिकट, बुळबुळीत असा पारदर्शक कफ बाहेर पडणे

२ उ २. सकाळी ६ वाजता खोकला चालू होणे

२ ऊ. आर्सेनिकम् आल्‍बम् (Arsenicum Album)

२ ऊ १. कोरडा खोकला, अस्‍वस्‍थता आणि सर्व शरिराची आग होणे

२ ऊ २. मध्‍यरात्रीनंतर, तसेच पाठीवर झोपल्‍यानंतर खोकला वाढणे

२ ऊ ३. पुष्‍कळ काळजी, थकवा असणे

२ ऊ ४. प्रत्‍येक वेळी थोडे थोडे पाणी पिणे

२ ए. फॉस्‍फोरस (Phosphorus)

२ ए १. कंठाच्‍या खालच्‍या बाजूला गुदगुल्‍या केल्‍याप्रमाणे संवेदना जाणवून खोकला चालू होणे

२ ए २. खोकला दिवस-रात्र असणे, कोरडा असणे किंवा खोकल्‍यातून अतिशय अल्‍प कफ पडणे

२ ए ३. गार पाणी प्‍यावेसे वाटणे, पाणी ग्रहण केल्‍यानंतर तात्‍पुरते बरेही वाटणे; परंतु काही वेळाने ते उलटून पडणे

२ ऐ. कॉस्‍टिकम् (Causticum)

२ ऐ १. अति बोलण्‍यामुळे संध्‍याकाळी कोरडा खोकला येणे

२ ऐ २. खोकून आवाज पूर्ण बसणे

२ ऐ ३. खोकतांना नकळत कपड्यांत लघवी होणे

२ ओ. रूमेक्‍स क्रिस्‍पस् (Rumex Crispus)

२ ओ १. मोकळी हवा अजिबात सहन न होणे

२ ओ २. सतत कोरडा खोकला येऊन त्‍यामुळे थकून जाणे

२ ओ ३. खोली किंवा हवामान यांमध्‍ये पालट झाल्‍याने अथवा थोडी जरी गार हवा नाकामध्‍ये गेली, तरी खोकला वाढणे

२ ओ ४. खोकला येत असतांना डोक्‍याला आणि चेहर्‍याला थंड हवा लागू नये, म्‍हणून डोक्‍याला कापड गुंडाळून बसणे

२ ओ ५. खोकला केवळ दिवसा येणे आणि रात्री नसणे

२ औ. स्‍पॉन्‍जिया टोस्‍टा (Spongia Tosta)

२ औ १. झोपून उठल्‍यावर, मानसिक श्रम झाल्‍यानंतर खोकल्‍याची उबळ येणे

२ औ २. गुदमरल्‍यासारखे होणे, लाकूड करवतीने कापत असतांना येणार्‍या आवाजाप्रमाणे खोकला येणे

२ औ ३. गरम पेय ग्र्रहण केल्‍यानंतर तात्‍पुरते बरे वाटणे

२ अं. अँटिमोनियम टार्टारिकम् (Antimonium Tartaricum)

२ अं १. छाती कफाने भरली असली, तरी कफ बाहेर न पडणे, तसेच कफ घट्ट असून बाहेर पडण्‍यास कठीण असणे

२ अं २. खोकतांना छातीमध्‍ये आग होणे

२ अं ३. थंड, दमट हवेमध्‍ये आणि रात्री खोकला वाढणे; बसून राहिल्‍याने बरे वाटणे

२ क. सॅम्‍बुकस नायग्रा (Sambucus Nigra)

२ क १. नाक बंद झाल्‍यामुळे श्‍वास घेणे कठीण होणे

२ क २. मध्‍यरात्री खोकल्‍यामुळे मूल गुदमरून झोपेतून जागे होणे

२ ख. कॅलियम कार्बोनिकम् (Kalium Carbonicum) : नेहमी पहाटे ३ वाजता खोकला येणे

३. बाराक्षार औषधे

३ अ. फेरम् फॉस्‍फोरिकम् (Ferrum Phosphoricum) : नुकताच चालू झालेला (acute) कोरडा खोकला, त्‍यासह ताप येणे

३ आ. नेट्रम् सल्‍फ्‍युरिकम् (Natrum Sulphuricum) : पिवळसर-हिरवट बडका पडणे, तसेच दमट हवेत छाती भरणे

सनातन चा आगामी ग्रंथ : ‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’

1 thought on “सर्दी, खोकला आणि होमिओपॅथी औषधे”

Leave a Comment