सहचर (मित्र) पिकांची लागवड

Article also available in :

१. झाडे एकमेकांना त्रासदायक ठरणारी नसावीत !

साधारणपणे जेव्‍हा एकाच जागेत किंवा एकमेकांजवळ दोन पिके एकाच वेळी घेतली जातात, तेव्‍हा ती एकमेकांना त्रासदायक न ठरता साहाय्‍य करणारी असावी लागतात. दोन पिके एकाच दिशेने वाढणारी असूनही चालत नाही, उदा. कुंडी लहान असेल आणि पिके एकमेकांना पूरक जरी असली, तरी मुळा आणि गाजर किंवा बटाटा एकत्र घेऊन चालणार नाही. तसेच वांगी आणि टोमॅटोही एकत्र घेऊन लाभ होणार नाही.

श्री. राजन लोहगांवकर

 

२. एकमेकांना साहाय्‍य करणार्‍या झाडांची उदाहरणे

झाडांमध्‍ये काही प्रकार असे आहेत की, जे कुठल्‍याही भाज्‍यांसोबत घेतले, तरी चालतात. ते नुसतेच फुले किंवा फळे देत नाहीत, तर बागेतील किडींवर नियंत्रण ठेवतात आणि मातीही सुपीक करतात. अशी पिके म्‍हणजे झेंडू आणि चवळी. झेंडू किडींना स्‍वतःकडे आकर्षित करून घेतो, तसेच आपल्‍या मुळांद्वारे सूत्रकृमींवरही (रोपांच्‍या मूळांतून रस शोषणार्‍या बारीक किड्यांवर) नियंत्रण ठेवतो. चवळीचे रोप शेंगा किंवा दाणे देण्‍यासह मातीमध्‍ये नत्राची (नायट्रोजनची) पातळी वाढवून नत्रप्रिय झाडांना वाढीसाठी साहाय्‍य करते. झाडे लावतांना माती, पाण्‍याची मात्रा, एकमेकांच्‍या वाढण्‍यासाठीची जागा, एकमेकांना ते साहाय्‍य करतात कि स्‍पर्धा करतात, तेही बघणे आवश्‍यक आहे.

३. कोणत्या पिकांची लागवड कुणासह करावी, तसेच कुणासह करू नये ?

 

भाजीचे नाव कुणासोबत लावावी ? कोणासोबत टाळावी ?
१. टोमॅटो झेंडू, लसूण, कांदा, तुळस, कोथिंबीर आणि गाजर बटाटा, बीट, बडीशेप, वांगी आणि मका
२. वांगी भेंडी, भोपळी मिरची, बटाटा, पालक आणि सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स) टोमॅटो
३.भेंडी वांगी, कलिंगड, काकडी, रताळी आणि भोपळी मिरची
४.मिरची तुळस, गाजर, कांदा, पालक, भेंडी, मुळा, बीट, मका, टोमॅटो, लसूण, काकडी, वांगी आणि लेट्युस ( कोबीप्रमाणे एक प्रकारची विदेशी भाजी)
५.बटाटा झेंडू, वाटाणा, मका, कोबी, वांगी, गाजर, कांदा आणि सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स) काकडी, भोपळा, टोमॅटो आणि सूर्यफूल
६. कारली वाटाणा, लाल भोपळा आणि सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स) बटाटे आणि पुदिना
७. गवार कोबी, फ्लॉवर, गाजर, वाटाणा आणि ब्रोकोली (एक प्रकारची विदेशी भाजी)
८. भोपळी मिरची झेंडू, कांदा, लसूण, तुळस, गाजर, वांगी आणि काकडी कोबी, फ्लॉवर, मोहरी,
बडीशेप आणि ब्रोकोली
९. गाजर झेंडू, भोपळी मिरची, मुळा, कांदा, सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स) आणि लेट्युस
१०. काकडी झेंडू, वाटाणा, गाजर, मुळा, कांदा, सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स) आणि लेट्युस बटाटे आणि सूर्यफूल
११. पालक मका, मुळा आणि सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स)
१२. गुलाब लसूण (याने गुलाबावरच्या किडीचेही नियंत्रण होते.)
१३. कोबी पुदिना आणि पालक
१४. कोबी आणि फ्लॉवर झिनिया (शेवंतीप्रमाणे फुले असणारे एक फूलझाड. यावर मित्रकीटक आकर्षित होतात आणि कोबी-फ्लॉवरवरील कीड खातात.), कांदा, बटाटा आणि झेंडू टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी
१५. कांदा वाटाणे आणि सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स) सोडून सर्व भाजीपाला वाटाणे आणि सर्व प्रकारचे
घेवडे (बीन्स)
१६. स्ट्रॉबेरी पालक, कांदा, सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स) आणि लेट्युस कोबी, फ्लॉवर आणि
ब्रोकोली
१७. कलिंगड आणि टरबूज मका आणि मुळा बटाटा
१८. बीट कांदा, कोबीवर्गीय भाज्या आणि लेट्युस घेवडा
१९. घेवडा मका, मुळा, काकडी आणि स्ट्रॉबेरी
२०. काकडी, दुधी,पडवळ, लाल भोपळा, कोहळा
आणि कलिंगड
मका, बीट, मुळा आणि सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स) बटाटा
२१. मेथी कोबी, फ्लॉवर, मका आणि ब्रोकोली
२२. कोथिंबीर कोबी, फ्लॉवर, पालक, वाटाणा, सर्व प्रकारचे घेवडे (बीन्स) आणि लेट्युस
२३. रताळी भेंडी, बीट आणि घेवडा लाल भोपळा
२४. आले जास्वंद, गवती चहा आणि मिरची
२५. हळद मिरची, गवती चहा आणि कोथिंबीर’
– श्री. राजन लोहगांवकर, टिटवाळा, कल्याण, जिल्हा ठाणे (साभार : https://vaanaspatya.blogspot.com)

Leave a Comment