विविध साधनामार्ग
जीव ईश्वराशी एकरूप होणे म्हणजे योग. हठयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग इत्यादी साधनामार्ग प्रचलित आहेत. या सर्वांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असा गुरुकृपायोग हा साधनामार्ग शीघ्र उन्नती करून देणारा आहे. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी प्रतिदिन करायच्या प्रयत्नांना साधना असे म्हणतात. या सदरामध्ये कोणत्याही साधनामार्गाचे मर्म म्हणजे एक ईश्वरी तत्त्व कसे ?, विविध योगमार्गांतील अडथळे, विविध योगमार्गांच्या तुलनेत गुरुकृपायोगाचे महत्त्व, भक्तांनी व्यवहारात वागतांना ठेवायचे विविध भाव, तसेच अनुष्ठानाची फलनिष्पत्ती त्वरित न दिसण्याचे कारण आणि त्यावरील उपाय इत्यादींचे विवेचन केले आहे.