घर सोडून अन्यत्र स्थलांतर करावे लागल्यास उपयुक्त ठरतील, अशा वस्तू

पुरासारख्या प्रसंगी शासकीय सूचना मिळाल्यानंतर काही वेळातच घर सोडावे लागते. अशा वेळी कोणत्या वस्तू समवेत असाव्यात, यांची सर्वसाधारण सूची पुढे दिली आहे. यामुळे ऐन वेळी धावपळ होणार नाही आणि ‘घराबाहेर पडतांना महत्त्वाचे साहित्य घरातच राहिले’, असेही होणार नाही.

अ. सर्व वस्तू भरण्यासाठी भक्कम आणि वाहतुकीस सोपी अशी मोठी पिशवी अन् पाठीवर लावण्याची पिशवी (सॅक)

आ. दंतमंजन, दाढीचे साहित्य, साबण, लहान आरसा, कंगवा, नेहमीच्या वापरातील कपडे, अंथरूण-पांघरूण आणि नियमित घ्यावी लागणारी औषधे

इ. साधारण तीन दिवस पुरेल एवढा सुका खाऊ आणि पिण्याचे पाणी

ई. भ्रमणभाष अन् त्याचा प्रभारक (चार्जर), विद्युत् पेढी (पॉवर बँक) आणि भ्रमणभाष क्रमांक लिहिलेली वही

उ. ‘सेल’वर चालणारी विजेरी आणि मोठा प्रकाशझोत असणारी विद्युत भारित विजेरी

ऊ. मेणबत्त्या आणि वातावरणात दमटपणा असला तरी किंवा पाणी लागले तरी पेटणारी काड्यापेटी

ए. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (उदा. शिधापत्रिका, आधारकार्ड, अधिकोशाचे ‘पासबूक’ यांच्या) छायाप्रती किंवा मूळ प्रती आणि ‘एटीएम कार्ड’

ऐ. प्रथमोपचाराचे साहित्य, तसेच नाक आणि तोंड झाकण्यासाठी ‘मास्क’

ओ. जाड दोरी, होकायंत्र आणि सर्वांना सतर्क करण्यासाठी शिटी

औ. आकाशवाणीवरून देण्यात येणार्‍या शासकीय सूचना, वृत्ते इत्यादी ऐकण्यासाठी ‘लहान रेडिओ (ट्रान्झिस्टर)’

अं. आध्यात्मिक उपायांचे साहित्य