सनातनचे संत

सर्वसामान्य आणि साधना न करणार्‍या व्यक्‍तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते अन् प्रतिदिन देवपूजा, पोथीवाचन, उपवास इत्यादी कर्मकांडातील साधना नियमित करणार्‍या व्यक्‍तींची आध्यात्मिक पातळी २५ ते ३० टक्के असते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीला व्यक्‍ती संतपदाला पोहोचते. हे संत समष्टीच्या कल्याणासाठी नामजप करू शकतात. मृत्यूनंतर त्यांना पुनर्जन्म नसतो. ते पुढील साधनेसाठी वा मानवजातीच्या कल्याणार्थ स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेऊ शकतात.

सनातनच्या संतांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१. संतांचा मनोलय झालेला असतो, म्हणजे त्यांच्या मनात केवळ गुरूंनी दिलेले नामच अखंड चालू असते किंवा त्यांची निर्विचार अवस्था असते.

२. संतांमध्ये प्रेमभाव आणि साक्षीभाव निर्माण झालेला असतो. त्याचेही प्रत्यंतर साधकांना येते.

३. त्यांच्या सहवासात उपाय होणे, नामजप आपोआप चालू होणे, मन निर्विचार होणे, अधिक आनंद आणि शांती जाणवणे इत्यादी अनुभूती येतात.

४. त्यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे चैतन्य वायूमंडल नेहमीच शुद्ध ठेवते.

५. संतांचा अहं अत्यल्प असल्याने ‘देव किंवा गुरु आपल्या माध्यमातून सर्वकाही करतात’, याची त्यांना क्षणोक्षणी जाणीव असते. त्यामुळे त्यांना स्वतःचे अस्तित्वही अत्यल्प जाणवत असते.

६. संत सातत्याने शरणागत भावात असल्यामुळे ते दीर्घ काळ आणि अधिक परिणामकारक समष्टी सेवा करू शकतात.

अशा प्रकारे संत सततच इतरांच्या कल्याणासाठी झटत असतात.

 

 

सनातनशी एकरूप झालेले संत !

परात्पर गुरु पांडे महाराज
प.पू. दास महाराज

सनातनची संतरत्ने

सनातनची संतरत्ने भाग १
सनातनची संतरत्ने भाग २
सनातनची संतरत्ने भाग ३
बालक संत

संतांचा साधनाप्रवास !

कलियुगात ईश्‍वरप्राप्तीसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ या याेगाची निर्मिति केली. त्यानुसार साधना करून सनातनच्या साधकांनी व्यक्तीगत आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठले. त्यांचा साधना प्रवास वाचून आपल्यालाही साधनेची प्रेरणा मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

अधिक माहिती वाचा…

संबंधित ग्रंथ

  • खंड ५ – संत भक्तराज महाराज यांची वैशिष्ट्ये आणि कार्य
    8190
    Buy Now
  • पू. वामन गर्भात असल्यापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख
    8190
    Buy Now
  • पू. भार्गवराम यांच्या जन्मापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख
    7785
    Buy Now
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय व संतांनी केलेला गौरव
    90100
    Buy Now