रक्षाबंधन (Rakshabandhan 2024)
रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो. या वर्षी ही तिथी १९ ऑगस्ट २०२४ या दिवशी आहे. बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. राखी बांधण्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. रक्षाबंधन या सणाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम व्यक्त केले जाते, त्याचप्रमाणे त्यांच्यातील देवाण-घेवाणही न्यून होत असतो. त्यामुळे हा सण भाऊ आणि बहीण या दोघांना ईश्वराकडे घेऊन जाणारा ठरतो.
१९.८.२०२४ या दिवशी रक्षाबंधन साजरा करण्याच्या योग्य वेळा
रक्षाबंधन कधी करावे ?
‘रक्षाबंधन भद्रारहित अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपराहृकाली किंवा प्रदोषकाली करावे’, असे ‘धर्मसिंधु’ नामक ग्रंथात आढळते. त्यामुळे या वर्षी १९.८.२०२४ या दिवशी अपराहृकाली किंवा प्रदोषकाली (सूर्यास्तानंतर साधारण अडीच घंटे) या वेळांमध्ये रक्षाबंधन करावे. ज्यांना या काळात रक्षाबंधन करणे शक्य नाही, त्यांनी दुपारी २ नंतर दिवसभरात कधीही रक्षाबंधन करण्यास आडकाठी (हरकत) नाही.
रक्षाबंधन कधी करू नये ?
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी दुपारी सुमारे १.३३ पर्यंत विष्टी करण आहे. ‘विष्टी करण (भद्रा) चालू असतांना रक्षाबंधन केल्यास हे नाशाला कारणीभूत होते’, असे निर्णयसिंधू ग्रंथात आढळते. त्यामुळे १९.८.२०२४ या दिवशी दुपारी १.३३ वाजेपर्यंत राखी बांधणे सर्वथा निषिद्ध आहे.
रक्षाबंधन असा साजरा करा !
हे करा !
हे करू नये !
रक्षाबंधनाच्या दिवशी हे करा !
रक्षाबंधनाच्या दिवशी हे करू नये !
हे करा !
हे करू नये !
भावाला देवतांच्या चित्र असलेल्या राख्या बांधून देवतांचे होणारे विडंबन टाळा !
रक्षाबंधन : इतिहास
१. पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.
२. ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली १२ वर्षे म्हणजे त्यांचे १२ दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
अर्थ : ‘जे बारीक रक्षासूत्र महाशक्तीशाली असुरराज बळीला बांधले होते, तेच मी तुम्हाला बांधत आहे. तुमचे रक्षण होवो. हा धागा तुटू नये आणि तुमचे सदैव रक्षण होवो.’
३. भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून चालू झाली.
४. प्राचीन काळातील राखी
तांदूळ, सोने आणि पांढर्या मोहर्या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोर्याने बांधली जाते.
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस.
राखी बांधण्यामागील शास्त्र
बहीण आणि भाऊ यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब संपण्यास साहाय्य होणे
बहीण आणि भाऊ यांचा एकमेकांत साधारण ३० प्रतिशत देवाण-घेवाण हिशोब असतो. देवाण-घेवाण हिशोब राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून न्यून होतो, म्हणजे ते स्थुलातून एकमेकांच्या बंधनात अडकतात; पण सूक्ष्म-रूपाने एकमेकांत असणारा देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात.
आध्यात्मिक दृष्टीकोण : पुरुषांमध्ये कार्यरत यमलहरींना आळा घालणारी राखी
राखी पौर्णिमा अर्थात् रक्षाबंधन या दिवशी वातावरणात यमलहरींचे प्रमाण जास्त असते. पुरुषांच्या देहात यमलहरींचे प्रवाह वहाणे चालू झाले की, त्यांची सूर्यनाडी जागृत होते. या जागृत सूर्यनाडीच्या आधारे देहातील रज-तमाची प्रबलता वाढते, आणि यमलहरी पूर्ण शरिरात प्रवेश करतात. जिवाच्या देहात यमलहरींचे प्रमाण ३० प्रतिशतहून अधिक झाल्यास त्याच्या प्राणाला धोका उद्भवण्याची शक्यता असते. शक्तीबीजरूपी बहिणीने राखी बांधल्याने पुरुषातील शिव-तत्त्व जागृत होते. यामुळे त्याची सुषुम्नानाडी काही अंशी जागृत होते. त्यामुळे राखीचे बंधन घातल्याने प्रवाहित होत असलेल्या यमलहरींना, तसेच त्यांना प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी साहाय्य करणार्या सूर्यनाडीला शांत करता येते.’ – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ३०.७.२००६, दुपारी १.४५)
भावनिक दृष्टीकोण : भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम आणि क्रोध निष्प्रभ होणे
‘रक्षाबंधन हे विकारांमध्ये पडणार्या तरुण-तरुणींसाठी एक व्रत आहे. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पालटतो.
एक मुलगी शेजारच्या मुलाकडे वाईट दृष्टीने पाहात होती. ती मुलगी बुद्धीमान होती. तिच्या मनात विचार आला, ‘माझे मन मला धोका तर देणार नाही ना !’ ती एक राखी घेऊन आली आणि तिने त्याला राखी बांधली. त्या वेळी मुलाच्याही मनात विचार आला, ‘अरे, मीही तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहात होतो. ताईने माझे कल्याण केले.’
भावा-बहिणीचे हे पवित्र बंधन तरुण-तरुणींना विकारांच्या गर्तेत पडण्यापासून वाचवण्यास समर्थ आहे. भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम शांत होतो. क्रोधाचेही शमन होते आणि समतायुक्त विचारांचा उदय होऊ लागतो.
रक्षाबंधन हे पर्व समाजातील तुटलेल्या मनांना जोडण्याची एक सुसंधी आहे. याच्या आगमनाने कुटुंबातील आपापसातील कलह शांत होऊ लागतात. दुरावा दूर होऊ लागतो आणि सामूहिक संकल्पशक्ती साकार होऊ लागते. – ऋषी प्रसाद, ऑगस्ट २००९
रक्षाबंधन या सणाविषयी सूक्ष्म ज्ञान
संदर्भ ग्रंथ
वरील माहिती सनातनच्या ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ या ग्रंथातून घेतली आहे. रक्षाबंधन प्रमाणे अन्य सणांची माहिती जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचा.
बहिणीला अनमोल ग्रंथ भेट द्या !
व्यक्तीमत्त्व-विकास
स्वभावदोष (षड् रिपू) – निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया
कला
सात्त्विक मेंदी
संस्कार
अभ्यास कसा करावा ?