श्रेणी २ सत्संग १ : सत्सेवा आणि सत्सेवेचे महत्त्व
सत् म्हणजे ईश्वर ! सत्सेवा म्हणजे ईश्वराची सेवा ! आजच्या काळात प्रत्यक्ष ईश्वराची सेवा करणे अशक्य असल्याने संतांची सेवा करावी, असे म्हटले आहे. संत हे ईश्वराचे सगुण रूप आहे. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर संत हे ईश्वराचे दूत आहेत. जसे एखाद्या देशाचा राजदूत त्या देशाचे प्रतिनिधित्व करतो, तसे संत हे ईश्वराचे पृथ्वीवरील प्रतिनिधी असतात…