‘हर घर भगवा’ या मोहिमेअंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भगव्या ध्वजाचे पूजन !
हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ऑक्टोबरपासून ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला.